यंदाचा ‘काव्यरत्न पुरस्कार’ प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
तडसर (सदानंद माळी): येथील कवी पांडुरंग माळी (गुरुजी) यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिम्मित देण्यात येणारा ‘काव्यरत्न पुरस्कार’, कवी, शाहीर, गीतकार प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. विश्वनाथ गायकवाड, सदानंद माळी यांनी दिली.
पुरस्काराचे स्वरूप दोन हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे.  या पुरस्कार निवड समितीमध्ये प्रा. विश्वनाथ गायकवाड दीपक पवार, दत्ता सपकाळ, रघुराज मेटकरी यांचा समावेश होता.
तडसर (ता. कडेगाव) येथे रविवार दिनांक २०/११/२०१६ रोजी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. अध्यक्षस्थानी अमृतवेल मिडिया प्रा. लिमिटेड चे व्यवस्थापकीय संपादक धर्मेंद्र पवार असतील.
पुरस्कार सोहळ्यास साहित्यप्रेमी रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक सदानंद माळी यांनी केले आहे.
img-20161111-wa0016

जाहिरात

untitled-3

Leave a Reply

Your email address will not be published.

यंदाचा ‘काव्यरत्न पुरस्कार’ प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पहिल्या दिवशी कडेगावमध्ये कर भरण्यास अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद

कडेगाव: आज पहिल्या दिवशी कडेगाव नगरपंचायत येथे राज्याच्या इतर शहरांच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा कमी कर भरणा झाला. आज पहिल्या-वहिल्या नगरपंचायत निवडणुकीचे

Close