कडेगाव येथे पक्षीय प्रचारास भाजपच्या पदयात्रेने सुरवात0 मिनिटे
कडेगाव (सदानंद माळी) : कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणूक पक्षीय प्रचारास आज औपचारिकपणे सुरुवात भाजपातर्फे काढण्यात आलेल्या पदयात्रेने झाली.
कॉंग्रेस पक्षाचा प्रचार शुभारंभ उद्या सकाळी माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे .
कडेगाव नगरपंचायत प्रचाराची रणधुमाळीचा श्रीगणेशा आज भारतीय जनता पार्टी च्या पदयात्रेने झाला. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे श्रीफळ वाढवण्यात आला.
शिवाजी चौक येथून फेरी काढून पदयात्रेस सुरवात झाली.
यावेळी सर्व सतरा उमेदवार तसेच पक्षाचे नेते मा.चंद्रसेन भाऊ देशमुख,पाडुरंग डांगे,वसंत गायकवाड,सुनिल गाढवे,धनंजय देशमुख,हणमंत गायकवाड, श्रीनिवास कराडकर,लक्ष्मण डांगे,सलामत पटेल,राजाराम गरुड तसेच तरुण वर्ग व भाजपा चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अपक्ष उमेदवारांच्या प्रचारास आज दुपारपर्यंत सुरवात झाली नव्हती.