विशेष मुदतीमध्ये कडेगाव नगरपंचायत मध्ये फक्त १,५८,००० कर भरणा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): ११ ते १४ नोव्हेंबर २०१६ या विशेष कर भरणा करण्याच्या काळात शासनाने जुन्या ५०० व हजार च्या नोटा वापरून कर भरण्यास उत्तेजन दिले होते. कडेगाव नगरपंचायत मध्ये या काळात एकूण १,५८,००० /- रुपये करभरणा झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नुकत्याच ग्रामपंचायतीमधून नगरपंचायती मध्ये परावर्तीत झालेल्या प्रशासनाने सदर विशेष कर भरणा मोहिमेस चांगलीच प्रसिद्धी दिली होती. तरीही, थकबाकीच्या तुलनेत अल्प प्रमाणत कर भरणा झाला असल्याचे दिसत आहे.

नगरपंचायतने जामा केलेल्या करांमधून स्थानिक रोजगार मिळतो, तसेच स्वच्छ पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता कामे जसेकी कचरा गोळा करणे  होते. तसेच, या पासून ते स्वच्छ भारत मिशन व इतर शासकीय योजनांमध्ये सहभागी होता येते.

करभरणा हा कडेगावच्या विकासासाठी आवश्यक असून त्यात सहभागी होणे व वेळेवर कर भरणे हे नागरीकांनी कर्तव्य म्हणून घेणे आवश्यक आहे.

 

जाहिरात

untitled-3

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

विशेष मुदतीमध्ये कडेगाव नगरपंचायत मध्ये फक्त १,५८,००० कर भरणा

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव येथे पक्षीय प्रचारास भाजपच्या पदयात्रेने सुरवात

कडेगाव (सदानंद माळी) : कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणूक पक्षीय प्रचारास आज औपचारिकपणे सुरुवात भाजपातर्फे काढण्यात आलेल्या पदयात्रेने झाली. कॉंग्रेस पक्षाचा प्रचार

Close