लिंगायत धर्म सभा व धर्म महामेळावा निर्धारयुक्त वातावरणात संपन्न0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
बीड: कपिलधार येथे काल लिंगायत महामेळावा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.
लाखोंच्या समुदायाला संबोधित करताना लिंगायत मंत्री विजयकुमार देशमुख (मालक) यांनी भाषणात आपले मनोगत व्यक्त केले.
img-20161115-wa0018
समाजामुळेच मी तीनदा निवडून आलो आहे आणि समाजासाठी मी कधीही रस्त्यावर उतरायला तयार आहे असे प्रतिपादन मंत्री देशमुख यांनी केले. मुख्य मार्गदर्शन डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले.
img-20161115-wa0016
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना , तसेच आंध्रप्रदेश इथून आलेल्या हजारो लिंगायत धर्मियांनी या महामेळाव्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चारी राज्यातील लिंगायत धर्मियांच्या वेगवेगळ्या मठाचे प्रमुख कालच्या महामेळाव्यास उपस्थित होते.
लिंगायत धर्मास स्वतंत्र संविधानिक मान्यता मिळावी तसेच लिंगायत धर्मातील सर्व कायकजीवी जातींना आरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी सध्या सर्वत्र लिंगायत धर्मीय एकजूट दाखवत आपल्या मागण्या समोर ठेवत आहेत.
img-20161115-wa0023
या संदर्भात सरकारने लक्ष घालून त्वरित कृती करावी यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्याचा निर्धार करण्यात आला.
अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात

for-kplive-manoj-custom-custom-custom

 

One thought on “लिंगायत धर्म सभा व धर्म महामेळावा निर्धारयुक्त वातावरणात संपन्न

  • November 15, 2016 at 2:37 pm
    Permalink

    Nice

Leave a Reply

Your email address will not be published.

लिंगायत धर्म सभा व धर्म महामेळावा निर्धारयुक्त वातावरणात संपन्न

by admin वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
विशेष मुदतीमध्ये कडेगाव नगरपंचायत मध्ये फक्त १,५८,००० कर भरणा

कडेगाव (सदानंद माळी): ११ ते १४ नोव्हेंबर २०१६ या विशेष कर भरणा करण्याच्या काळात शासनाने जुन्या ५०० व हजार च्या

Close