हा डाग चांगला आहे…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव (सदानंद माळी): आपल्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेत मतदानासाठी बऱ्याच पातळीवर वेगळा स्टाफ नसतो. शिक्षक किंवा काही शासकीय अधिकारीच हे महत्वाचे कार्य पाडतात. कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या तहसीलदार मा. शेटे आणि मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी यात आदर्श निर्माण केला आहे. मतदानाच्या जागृतीसाठी त्यांनी स्वतः काही संकल्पना राबवल्या आहेत. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जात आहे. याबाबत स्वीप नावाचा सरकारचा प्रोग्राम आहे. तो इथले हे अधिकारी अतिशय कल्पकतेने राबवत आहेत.
img-20161116-wa0020
अगदी सकाळी कचरा गोळा करायला नागरिकांच्या दारात जाणारी घंटागाडीही याबाबत जनजागृती करते. मतदार जागृती अभियानांतर्गत अंतर्गत बुधवारी कडेगावमधे पथनाट्य सादर करण्यात आले. विविध ठिकाणी विटा येथील कलाकारांनी प्रभावीपणे जनजागृती केली. त्याचबरोबर आज केंद्राध्यक्ष ट्रेंनिग पार पडले.
img-20161116-wa0021
लोकशाहीत प्रत्येक मताला महत्त्व असते. निर्भय वातावरणात प्रत्येकाने विचारपूर्वक मतदान करावे, याच तळमळीने हे अधिकारी अहोरात्र राबत आहेत. अविचारातून चुकीचे प्रतिनिधी निवडले गेले तर विकासाचा काय खेळखंडोबा होतो, हे आपण पाहतोच आहोत. म्हणूनच प्रसंगी पदरमोड करून निर्भयपणे मतदानासाठी आग्रह धरणारे या अधिकाऱ्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
img-20161116-wa0030
एकूणच, प्रशासन कडेगावच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी पूर्ण सज्ज होत आहे आणि आपल्यासोबत मतदारानाही तयार करत आहे. लोकशाहीच्या भविष्यासाठी असे उपक्रम निश्चितच स्तुत्य आहेत.

जाहिरात

manij-logo-custom

Leave a Reply

Your email address will not be published.

हा डाग चांगला आहे…!!!

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचा प्रचार शुभारंभ

कडेगाव (सदानंद माळी): कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते आज कडेगाव येथे नगरपंचायत

Close