ग बाई पिंगळा बोलला …: काव्यरत्न पुरस्कार प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना तडसर येथे प्रदान0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

तडसर (सदानंद माळी): प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना आज तडसर (ता.कडेगाव) येथे ‘कवी पांडुरंग माळी काव्यरत्न पुरस्कार’ भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मेंद्र पवार तर प्रमुख पाहुणे व पुरस्कार वितरक म्हणून डॉ. बाबुराव गुरव होते.

मराठी साहित्य परिषद, कडेगाव-खानापूर यांचे वतीने देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार आज कवी पांडुरंग माळी यांचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार सदानंद माळी व कुटुंबियांच्या उपस्थितीत तडसर या कवी माळी यांच्या मूळ गावी देण्यात आला. 

डॉ.गुरव यांनी मा. करके सरांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचा विशेष उल्लेख करून पुरस्कार स्विकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  धर्मेंद्र पवार यांनी मा.करके सरांच्या साहित्यिक प्रतिभेचे कौतुक केले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आभारपद भाषणात प्रा. कुंतीनाथ यांनी कविता सामान्य माणसाच्या तोंडात बसणारी असावी असा देशीवादी साहित्यिक विचार मांडला. गाणं अजरामर असावं आणि ते कालातीत असावं असं त्यांनी सांगितलं.

भाषणादरम्यान पुरस्कारप्राप्त कवी करके-पाटील यांनी त्यांचे बहुविध काव्यप्रकार व गाण्यांची पेरणी करत श्रोत्यांना आज अवर्णनीय भेट दिली. अत्यंत विनोदी शैलीमध्ये त्यांनी तात्विक विचार मांडताना माणसाला तीन प्रकारचे शत्रू असतात घरचे, वरचे, आणि पदरचे असे सांगितले तेव्हा श्रोत्यांनी टाळ्या वाजवून सभागृह जिवंत केले.धरतीतल्या लेकरात आणि सिटीतल्या लेकरातला मूलभूत मूल्यात्मक फरक सांगताना कवींनी कृषिसंस्कृतीच्या दातृत्वाचा गौरव केला.शाहीर महाराष्ट्राला वळण देऊ शकतो आणि महाराष्ट्र पेटून उठवू शकतो, अशी ताकद फक्त शाहिरीमध्ये आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदानंद माळी यांनी केले तर सूत्रसंचालनाची जबाबदारी मन्सूर जमादार यांनी पार पाडली.आभारप्रदर्शनाची जबाबदारी रघुराज मेटकरी यांनी पार पाडली.
 

ग बाई पिंगळा बोलला …: काव्यरत्न पुरस्कार प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना तडसर येथे प्रदान

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
हा डाग चांगला आहे…!!!

कडेगाव (सदानंद माळी): आपल्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेत मतदानासाठी बऱ्याच पातळीवर वेगळा स्टाफ नसतो. शिक्षक किंवा काही शासकीय अधिकारीच हे महत्वाचे

Close