‘समृद्धी’चा ‘अनब्रेकेबल’ आयडॉल :  श्री. प्रमोद मालू0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

जरी जगभरात प्लास्टिक हटावचा नारा घुमत असला तरी भारतात मात्र गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि लहानांपासून थोरांपर्यंत ‘समृद्धी’ची प्लास्टिक उत्पादने घरोघरी लोकप्रिय आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांच्या गरजांनुसार निर्मिती, जगभरातील अत्याधुनिक तंत्राचा वापर आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या समृद्धीसाठी अहोरात्र झटणारी ‘समृद्धी’ची टीम. आणि या सर्व कौतुकास्पद प्रकल्पाचं श्रेय जात ते ‘समृद्धी’तील चाणक्य समजले जाणारे श्री. प्रमोद मालू यांना.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरसारख्या छोट्याशा गावातून उद्योग क्षेत्रात अल्पावधीतच वेगाने प्रगती करणारी कंपनी म्हणून ”समृद्धी” चे नाव आज उद्योग क्षेत्रात आवर्जून घेतले जाते. या कंपनीने देशातील अनेक राज्यामध्ये, शहरामध्ये, गावांमध्ये, खेड्यामध्ये प्लास्टिक क्षेत्रात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहेच, त्याचबरोबर ग्राहकाशी ‘अनब्रेकेबल’ नातेदेखील जोडले आहे. या कंपनीचे नाव जरी ”समृद्धी” असले तरीदेखील अजूनही काही जुने लोक ‘मालू ब्रदर्स’ या नावानेसुद्धा या कंपनीला ओळखतात. याचे कारण, या कंपनीतील प्रशासनाची प्रमुख  जबाबदारी तीन भावंडांच्या खांद्यावर आहे. जरी ही जबाबदारी खूप मोठी असली तरी देखील ही भावंडे ही जबाबदारी अगदी खांद्याला खांदा लावून पार पाडत असतात. यामध्ये वरिष्ठ बंधू श्री रमाकांत मालू, कनिष्ठ बंधू श्री ओमप्रकाश मालू आणि सर्वात लहान श्री. प्रमोद मालू, ज्यांचा आपण वाढदिवस आज ( दि.२१ नोव्हे. ) रोजी मध्ये उत्साहात साजरा करत आहोत. श्री प्रमोद मालू यांच्या खांद्यावर या कंपनीतील सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे वित्त विभागाची आहे आणि ते ती यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. त्यांच्याकडे आज आम्ही एक ‘आयडॉल’ आणि आमचे आधारस्तंभ म्हणून पाहत आहोत. त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी खूप वाखाणण्याजोगी आहे. त्यांचा जन्म जयसिंगपूर या गावामध्ये श्री. नारायण मालू आणि सौ. गीता मालू यांच्या पोटी झाला. लहानपणापासूनच घरामध्ये उद्योग क्षेत्राचे ज्ञान त्यांना मिळाले. पुढे त्यांनी शिक्षण घेताना उद्योग क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणा-या वित्त विभागाचे घेतले. यातूनच त्यांच्या दूरदृष्टीची झलक आपणास पाहण्यास मिळते. आज देशाचा विचार करत असताना संपूर्ण देशाची जबाबदारी वित्त विभागावरच असते. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच आपल्या दोन भावंडाना एक भक्कम साथ देण्याचा निर्णय घेतला व त्याचबरोबर वित्त विभागाची संपूर्ण कमान आपल्या खांद्यावर घेतली. आज गेली १७ वर्षे ही कंपनी जगामध्ये आर्थिक संकट येऊदे किंवा देशामध्ये आर्थिक संकट येऊदे, याचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचे काटेकोर नियोजन आणि त्यांची अमलबजावणी करण्याचे काम श्री प्रमोद मालू करत आहेत. यामध्ये त्यांच्याकडून कंपनीची काळजी तर घेतली जातेच पण आपल्या कंपनीच्या अस्तित्त्वाला धक्का पोहचणार नाही, याची देखील ते काळजी घेत असतात.

आज या कंपनीची अद्यावत अशी एकूण ६ युनिटे आहेत. त्यामधील दोन युनिट राज्याबाहेर आहेत तर हजारोंच्या संख्येने डिलरशिप (विक्रेते) आहे. लाखोंच्या घरात ग्राहकांची संख्या आहे तर कोट्यवधी घरात समृद्धीच्या उत्पादनातील उत्पादन पोहचले आहे. याचे श्रेय श्री प्रमोद मालू यांच्याबरोबर दोन भावंडाच्या उत्कृष्ठ कार्यक्षमतेला जाते. श्री प्रमोद मालू यांनी वित्त विभाग सांभाळत असताना अनेक चढ-उतार पहिले आहेत. त्यांनी यशस्वीरीत्या त्यांचा सामना केला आहे. म्हणूनच ते नेहमी आपला वाढदिवस आपल्यावर प्रेम करणा-या आपल्या सहका-याबरोबर साजरा करत असतात. यांच्याबद्दल मला एवढेच सांगावेसे वाटते की, त्यांनी आपल्या कंपनीचे नाव देशामध्ये, देशाबाहेर असणारे मूळ अस्तित्व आणि लोकांच्या मनातील कंपनीचे स्थान अजूनही नावाप्रमाणेच ‘अनब्रेकेबल’ ठेवले आहे. उद्योग क्षेत्रातून लोकांच्या हितासाठी आपली प्रतिष्ठापणाला लावणारे आमचे लाडके श्री प्रमोद मालू याना समृद्धी परिवार आणि युनिट ४ कडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…

लेखक : कांबळे सचिन

( युनिट ४, मदनापल्ली, आंध्रप्रदेश )

‘समृद्धी’चा ‘अनब्रेकेबल’ आयडॉल :  श्री. प्रमोद मालू

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
ग बाई पिंगळा बोलला …: काव्यरत्न पुरस्कार प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना तडसर येथे प्रदान

तडसर (सदानंद माळी): प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना आज तडसर (ता.कडेगाव) येथे 'कवी पांडुरंग माळी काव्यरत्न पुरस्कार' भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात

Close