लिंगायत धर्माची, बसवन्ना यांच्या वचन साहित्याची भेट पंतप्रधान मोदींना0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

दिल्ली: लिंगायत साहित्याचे अभ्यासक व नेते अरविंद जट्टी यांनी लिंगायत धर्माचे संस्थापक जगतगुरू बसवेश्वर यांच्या वचन साहित्याच्या गुजराती अनुवाद आज पंतप्रधान मोदी यांना भेट दिला.

अरविंद जट्टी हे ‘बसव समिती’ चे संस्थापक माजी कार्यकारी राष्ट्रपती मा.  बसप्पा दानाप्पा जट्टी  यांचे चिरंजीव.

लिंगायत धर्माचे आणि तत्वज्ञानाचे सार्वत्रिक प्रसार करण्याच्या दृष्टीने मुलभूत योगदान दिलेल्या माजी  राष्ट्रपती जट्टी यांचे काम मा. अरविंद जट्टी  पुढे नेत आहेत.  या अंतर्गत अलीकडे त्यांच्या संस्थेने लिंगायत धर्मसंस्थापक बसवेश्वर यांच्या वचन साहित्याचा गुजराती अनुवाद केला. त्याची प्रत पंतप्रधान मोदी यांना भेट देण्यात आली.

लिंगायत धर्माच्या स्वतंत्र संविधानिक मान्यतेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सर्व लिंगायत धर्मियांनी व  संस्थांनी सुरु केलेले काम पंतप्रधानांपर्यंत पोचवण्याचे काम केल्याबद्दल मा. अरविंद जट्टी  यांचे लिंगायत धर्मियांतर्फे देशभर आभार मानण्यात येत आहेत.

लिंगायत धर्माची, बसवन्ना यांच्या वचन साहित्याची भेट पंतप्रधान मोदींना

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
काँग्रेसचे  उमेदवार मोहनराव कदम ६३ मतांनी विजयी

सांगली(सदानंद माळी): विधान परिषद निवडणूक निकाल आत्ताच हाती आला असून सांगली  विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे  उमेदवार मोहनराव कदम ६३ मतांनी

Close