चैत्यभूमीवर भीमसैनिकांची अलोट गर्दी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई (सचिन कांबळे) : महामानव व बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कऱण्यासाठी राज्यभरासह देशभरातील लाखो अनुयायी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसैनिकांची अलोट गर्दी झाली आहे.

या करिता चैत्यभूमी परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. समुद्रच्या जवळच असल्याने चैत्यभूमीच्या परिसरात सागरी पेट्रोलिंग केली जाणार आहे. याठिकाणी दोन हजार पोलिस कर्मचारी आणि तीन हजार समता सैनिक तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नोटबंदीचा परिणाम जसा देशभर आहे तसा इथेही दिसून येत आहे. अनेक वर्षाप्रमाणे अगोदरच आठ दिवसांपासून विविध आंबेडकरी स्टॉल्स लागायचे पण यंदा या परिसरात तुरळक स्टॉल्स दिसून येत आहेत. तसंच दुरुन येणाऱ्या लोकांनाही नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र यावर्षीदेखील भीमसैनिक गर्दीचा उच्चांक मोडतील यात काही शंका नाही.

फोटो सौजन्य: Livemint

चैत्यभूमीवर भीमसैनिकांची अलोट गर्दी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन

चेन्नई :  तामिळनाडूच्या सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जयललिता यांच्याकडे पहिले जात होते. त्यांना लोक ‘अम्मा’ या नावाने ओळखत होते. बऱ्याच

Close