तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

चेन्नई :  तामिळनाडूच्या सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जयललिता यांच्याकडे पहिले जात होते. त्यांना लोक ‘अम्मा’ या नावाने ओळखत होते. बऱ्याच दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी चेन्नईतील सर्वात मोठ्या अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं.  तिथेच त्यांचे निधन झाले त्या ६८ वर्षांच्या होत्या. जयललितांच्या रुपाने दक्षिण भारताच्या राजकारणातील दिग्गज चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे.  सोमवारी रात्री ११.३० वाजता अपोलो रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारपासून त्यांची प्रकृती खूपच चिंताजनक होती. लाखो समर्थक गेली अनेक दिवसापासून जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात यासाठी रात्रंदिवस प्रार्थना करत होते, मात्र अखेर त्यांची एकाकी झुंज अपयशी ठरली.

तामिळनाडूच्या सरकारने ७ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. तर तीन दिवस शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. जयललिता यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ४ वा  तामिळनाडूतील मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी जयललितांच्या अंत्यदर्शनला जाणार, महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन मोदी चेन्नईला रवाना होणार व सरकारतर्फे व्यंकय्या नायडू आणि पी.राधाकृष्णन हे दोन केंद्रीय मंत्री जयललितांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. तसेच जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चेन्नईला जाणार आहेत.

फोटो सौजन्य: Dekh News

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कोल्हापूर जिल्ह्यात ​सत्ताधाऱ्यांचा धुव्वा भाजपाची मुसंडी

कोल्हापूर :  जिल्ह्यातील आठपैकी सात नगरपालिकांत सत्तांतर घडवून मतदारांनी प्रस्थापितांचा धुव्वा उडवला आहे. या सातही ठिकाणी भाजपा आघाडीने मुसंडी मारली.

Close