स्पर्धा परीक्षा व स्वत्व विकासाबाबत ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कडेगाव येथे मोफत कार्यशाळा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी) : आपल्या परिसरातील मुलामुलींना स्पर्धा परीक्षा आणि स्वत्व विकास याबाबत मोफत मार्गदर्शन करण्यासाठी ईद-ए-मिलादुन्नबी च्या पवित्र दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व स्वत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अॅड. आश्रफ इसाक इनामदार यांनी दिली.

आपल्या परिसरातील मुलामुलींना वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विविध संस्थांच्या मदतीने असे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात ईदच्या पवित्र दिवशी करण्यात येत आहे. यासाठी मा. जमीर लेंगरेकर, उपायुक्त, उल्हासनगर महानगरपालिका आणि अॅड. आश्रफ इसाक इनामदार, यांचे देणगी व सामाजिक योगदानातून हा उपक्रम होत आहे.

यात पहिल्या सत्रात ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर पुणे येथील ‘युनिक अकॅडेमी’चे श्री उदय कदम यांचे  तर ‘ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसामोरील आव्हाने’ या विषयावर श्री. इंद्रजीत यादव यांचे व्याख्यान होईल.

दुसर्‍या सत्रात ‘सेल्फहूड’ संस्थेचे संचालक व आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. गोविंद धस्के स्वत्व विकास म्हणजेच ओळख स्वताची या विषयावर मार्गदर्शन करतील. दि. ११ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत कडेगाव येथील श्रीरंग नामदेव कदम ज्युनियर कॉलेज, महात्मा गांधी विद्यालय परिसर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

सहभागी युवक व युवती या कार्यक्रमामध्ये युनिक अकॅडेमी यांची स्पर्धा परीक्षेवरील पुस्तके ५०% सवलतीच्या दरात खरेदी करू शकतील. तसेच ‘सेल्फहूड’ तर्फे काही दिवसात होणाऱ्या त्यांच्या ‘संवांदतंत्र व इंग्लीश स्पिकिंग’ कार्यशाळेमध्ये ५०% फी सवलत मिळण्यासाठीचे कुपन मिळेल. तरी ग्रामीण भागातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९७६६२९३९२१ या नंबरवर संपर्क साधावा.

 

स्पर्धा परीक्षा व स्वत्व विकासाबाबत ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कडेगाव येथे मोफत कार्यशाळा

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
लोकनेते आमदार मोहनराव कदम यांचा नागपूर येथे शपथविधी उत्साहात

कडेगाव (सदानंद माळी) : सातारा-सांगली विधान परिषद मतदार संघाचे आमदार लोकनेते मोहनराव कदम यांचा शपथविधी नागपूर इथं कॅबिनेट हॉलमध्ये मोठया

Close