ग्रामीण तरुण-तरुणींमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याची उत्तुंग क्षमता, कष्टाची तयारी हवी : जमीर लेंगरेकर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): ग्रामीण युवक-युवतींमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारे ‘रसायन’ असून त्यांनी कष्टाची तयारी ठेवून यश मिळवावे असे प्रतिपादन उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त व कडेगावचे सुपुत्र मा. जमीर लेंगरेकर यांनी काल कडेगाव येथे केले. ‘ईद-ए-मिलाद’ च्या पवित्रदिनाच्या अनुषंगाने सेल्फहूड व युनिक अकॅडेमी, पुणे या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यशाळेत ते बोलत होते. ग्रामीण परिसरातील स्पर्धापरीक्षेमध्ये यश मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन व सुविधा मिळण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे मा. लेंगरेकर यांनी सांगितले.

कडेगाव येथे रविवारी संपन्न झालेल्या ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व स्वत्व विकास कार्यशाळेमध्ये पलूस, कडेगाव, विटा, व कराड परिसरातील १०० पेक्षा जास्त युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पहिल्या सत्रामध्ये युनिक अकॅडेमी, पुणे येथील श्री. उदय कदम व श्री. इंद्रजीत यादव यांची स्पर्धा परीक्षा विषयी व्याख्याने झाली. श्री. कदम यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी जितकी सर्वसमावेशक तितकीच अचूक पद्धतीने करावी लागते या गोष्टी अधोरेखित करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी संबंधी विविध गोष्टीविषयी मार्गदर्शन केले.

‘युनिक’ च्या इंद्रजीत यादव यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विशेष पद्धतीने स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी व यात तोंड द्यावी लागणारी आव्हाने कोणती आहेत याविषयी विस्तृतपणे माहिती दिली. दोन्ही वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्पर्धापरीक्षाविषयक शंकांना उत्तरे दिली.

दुसऱ्या सत्रामध्ये सेल्फहूड या सर्वांगीण मानव विकास संस्थेचे संचालक डॉ. गोविंद धस्के यांनी स्वत्व व व्यक्तिमत्व विकास या संबंधी कार्यशाळा घेतली. ग्रामीण युवकांमधील  न्यूनगंड व कमीपणाची भावना ही चुकीच्या व्यक्तिमत्व विकास संकल्पनेतून कशी वाढते व यावर सेल्फहूड संस्थेद्वारा संशोधीत पद्धतीने तयार करण्यात आलेला स्वत्व आधारित व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम स्पर्धापरीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कसा उपयुक्त आहे हे सांगितले. डॉ. धस्के यांनी विद्यार्थ्यांच्या ‘स्व’, ‘न्यूनगंड’, ‘इंग्रजी संवाद तंत्राच्या मानसिक विकास पद्धती’, ‘स्ट्रेस व्यवस्थापन’ याविषयीच्या अनेक शंकांना उत्तरे दिली.

युनिक अकॅडेमी तर्फे लावण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या विक्री केंद्रावर सुमारे ५०% सवलतीमध्ये पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती याला सर्व विद्यार्थ्यांचा लक्षणीय प्रतिसाद होता.

या कार्यक्रमामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या प्राध्यापिका सौ. इनामदार, कडेगाव नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक मा. नितीन शिंदे, मैत्र प्रतिष्ठान चे प्रवीण नायकवडी व रुद्र प्रतिष्ठान हिंगणगाव बुद्रुक चे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मिसाळ यांनी केले. हा कार्यक्रम मा. जमीर लेंगरेकर व मा. आश्रफ इनामदार यांच्या सामाजिक योगदानातून आयोजित करण्यात आला होता.

 

जाहिरात:

ग्रामीण तरुण-तरुणींमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याची उत्तुंग क्षमता, कष्टाची तयारी हवी : जमीर लेंगरेकर

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
स्पर्धा परीक्षा व स्वत्व विकासाबाबत ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कडेगाव येथे मोफत कार्यशाळा

कडेगाव (सदानंद माळी) : आपल्या परिसरातील मुलामुलींना स्पर्धा परीक्षा आणि स्वत्व विकास याबाबत मोफत मार्गदर्शन करण्यासाठी ईद-ए-मिलादुन्नबी च्या पवित्र दिनानिमित्त

Close