शा. निवासी शाळा वांगीचे बालवैज्ञानिक प्रदर्शनात चमकले0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

वांगी (सदानंद माळी): येथील शासकीय निवासी शाळेच्या श्रेयस ढाले व संकेत रोकडे या विद्यार्थ्यांनी ४२ व्या कडेगाव तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांनी तयार केलेल्या पवनचक्कीपासून वीजनिर्मिती या उपकरणास पारितोषिक मिळाले.

या विद्यार्थ्यांचे श्री. कवले, सहा. आयुक्त समाज कल्याण आणि श्री. देवडे, समाजकल्याण अधिकारी यांनी अभिनंदन केले.

या पुरस्कारप्राप्त उपकरणाची निवड आता जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली असून पुढील वाटचालीस प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. भोसले, तसेच श्री. पाटील व अधीक्षक श्री. वाघमारे आणि सर्वश्री झेंडे, सुतार, सदामते, पखाले तसेच कदम व माने या शिक्षकांचे  मार्गदर्शन मिळत आहे.

जाहिरात

शा. निवासी शाळा वांगीचे बालवैज्ञानिक प्रदर्शनात चमकले

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
ग्रामीण तरुण-तरुणींमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याची उत्तुंग क्षमता, कष्टाची तयारी हवी : जमीर लेंगरेकर

कडेगाव (सदानंद माळी): ग्रामीण युवक-युवतींमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारे 'रसायन' असून त्यांनी कष्टाची तयारी ठेवून यश मिळवावे असे

Close