कडेगाव परिसरातला युवा बदलतोय..0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

संपादकीय…

सध्याच्या युवकांना हवंय तरी काय, असा प्रश्न जेव्हा आपल्यासमोर उपस्थित होतो, तेव्हा नोकरी हा पहिला पर्याय समोर येतो. त्यातल्या त्यात स्पर्धा परिक्षा देवून क्लास वन किंवा क्लास टू ऑफिसर होण्याचं स्वप्न बाळगुन अनेकजण आपल्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करतात. अशा युवकांना स्पर्धा परिक्षांचे क्लासेस आकर्षित करतात. काही ठिकाणी भरमसाठ पैसे जातात. अपेक्षित यश मिळत नाही. मग निराशा येते आणि पुन्हा अपयशाच्या खोल गर्तेत आयुष्याचा शोध सुरू होतो. ऐन उमेदीच्या काळात जर अशा मुलांना योग्य दिशा देणारं मार्गदर्शन  मिळालं तर आमच्या कडेगाव परिसरातले युवक-युवतीही मोठया पदांवर दिसतील. त्यांच्यात काहीच कमी नाही. सारं काही आहे, फक्त त्यांना हवं योग्य मार्गदर्शन. याच एका क्रांतीकारक कार्यासाठी आपल्या सर्व शक्तीनिशी पुढं आलेत ते कडेगावचे सुपुत्र आणि उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त मा. जमीर लेंगरेकर. ज्यांनी शाळा, शेती, शिक्षकाची नोकरी, स्पर्धा परिक्षा आणि आता उपायुक्त पदापर्यंत स्वकष्टानं झेप घेतली. प्रचंड वाचन, कष्ट, अभ्यास आणि केवळ जिंकण्याची जिदद हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण. याच मार्गाने माझ्या गावातला युवक आणि युवतीही जायला हवी, याच एका ध्यासातुन मा. जमीर लेंगरेकर यांनी कडेगाव परिसरातील युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा, करीयर, व्यक्तिमत्व विकास आणि स्वत्व विकास याबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला आहे. याच उपक्रमाची सुरूवात नुकतीच ईदनिमित्त झालेल्या एका कार्यक्रमाने झाली.

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना कोणताही पर्याय निवडा, मात्र तो पर्याय योग्य हवा. ‘सेल्फ स्टडी’ हा एक चांगला पर्याय मा. जमीर लेंगरेकर यांनी आपल्या वाटचालीतुनच उभा केला आहे. यापुढे अशाच काही उपक्रमातुन हा यज्ञ असाच चालु ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. बेरोजगार युवकांसाठी फॅक्टरी आणि प्रकल्प उभारून फक्त राजकारण करता येतं. मात्र असे शेकडो प्रकल्प उभारणारे अभ्यासु आणि प्रामाणिक अधिकारी घडवणे, हे महत्वाचे असते. म्हणूनच या उपक्रमात आता परिसरातील सर्वच संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि युवक, युवतींनी पुर्ण क्षमतेनं सहभागी होण्याची गरज आहे. कारण ही एक चळवळ आहे, समाजाला बदलण्याची…स्वत:ला घडवण्याची..!

कडेगाव परिसरातला युवा बदलतोय..

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शा. निवासी शाळा वांगीचे बालवैज्ञानिक प्रदर्शनात चमकले

वांगी (सदानंद माळी): येथील शासकीय निवासी शाळेच्या श्रेयस ढाले व संकेत रोकडे या विद्यार्थ्यांनी ४२ व्या कडेगाव तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेत

Close