येरळेमधील वाळू उपसा प्रतिबंध करणेबाबत शिवसेनेकडून निवेदन सादर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस : येरळेमधील वाळू उपश्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावत असून यावर तहसीलदार पलूस यांनी त्वरीत लक्ष घालून कारवाई करावी असे निवेदन पलूस शिवसेनेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.

सततच्या दुष्काळामुळे वाळू उपसा वाढला आहे आणि त्याच्या विपरीत परीणाम जनतेवर होत असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.

वाळू उपश्यावर प्रतिबंध करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या प्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत लेंगरे, महेंद्र पोतदार, जगदीश पवार,पै. श्रीकांत लेंगरे, महेश शिंदे, व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

येरळेमधील वाळू उपसा प्रतिबंध करणेबाबत शिवसेनेकडून निवेदन सादर

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव परिसरातला युवा बदलतोय..

संपादकीय... सध्याच्या युवकांना हवंय तरी काय, असा प्रश्न जेव्हा आपल्यासमोर उपस्थित होतो, तेव्हा नोकरी हा पहिला पर्याय समोर येतो. त्यातल्या

Close