ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव (सदानंद माळी): ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ८१  वर्षांचे होते. आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये सक्रीय सहभाग असलेले कै. होवाळ मूळचे तडसर या गावचे. वामन होवाळ उच्च शिक्षणासाठी ठाणे व नंतर सिद्धार्थ कॉलेज मुंबईला आले.
सत्यकथा, यशवंत, राजश्री, वसुधा, धनुर्धारी आदी मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या असून बेनवाड, येळकोट, वारसदार, वाटाआडवाटा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मजल्याचं घर, पाऊसपाणी या कथा इंग्रजी, फ्रेंच भाषेत अनुवादित झाल्या आहेत. जपून पेरा बेणं, आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात ही त्यांची लोकनाट्येही प्रसिद्ध आहेत. शंकर पाटील, मिरासदार, माडगूळकर यांच्या नंतरच्या पिढीतील प्रमुख कथाकथनकार म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. कथाकथनासाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या कथांमधून दलित ग्रामीण विश्वाचे दर्शन घडते. त्यांनी मुंबईमधील झोपडपट्टीमधील रहिवाशांचे आयुष्यही त्यांच्या कथांमधून रेखाटले.
कडेगाव-पलूस लाइव न्यूज कडून त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाला मानाचा मुजरा !

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावच्या नगराध्यक्षपदी आकांक्षा जाधव ; साजिद पटेल उपनगराध्यक्ष

कडेगाव (सदानंद माळी) : कडेगावला नगरपंचायत झाल्यावर पहिले नगराध्यक्ष होण्याचा ऐतिहासिक बहुमान काँग्रेसच्या आकांक्षा जाधव यांनी पटकावलाय. उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ

Close