क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ‘गुगल’ कडून गौरव0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई : पहिली मुलींसाठी शाळा काढलेल्या आणि महिला म्हणून मोठी कामगिरी केलेल्या सावित्रीबाई फुले यांचा गौरव गुगलने डूडलच्या माध्यमातून केला आहे. आपल्या देशात जेव्हा इंग्रज सरकार होते आणि आपल्या देशात महिलाना कोणतेही अधिकार नव्हते, तेव्हा महात्मा फुले यांच्या प्रेरणेने त्यांच्या पत्नी असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी सर्व विरोध झुगारून पुणे येथील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्या काळात महिलांना शिक्षण हे पाप समजले जात होते. सावित्रीबाई यांना फार मोठा विरोध झाला, मात्र त्यांनी सर्व विरोध झुगारला आणि मुलीना शिक्षण दिले होते. येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने, आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ‘गुगल’ कडून गौरव

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन

कडेगाव (सदानंद माळी): ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ८१ 

Close