माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने कडेगावच्या महात्मा गांधी विद्यालयात पाईपलाईनचे भूमिपुजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): क्षारयुक्त पाणी…कालांतराने जीर्ण झालेली पाण्याची टाकी…त्या पाण्यावर अवलंबून कडेगावचे भवितव्य. महात्मा गांधी विद्यालयाचे हे वास्तव….ज्या विद्यालयाने जगाच्या व्यासपीठावर स्वताला सिद्ध करणारे विद्यार्थी घडवले. हे वास्तव बदलण्यासाठी पुढे आले भावनिकता जपणारे माजी विद्यार्थी आणि त्यांच्याच पुढाकाराने विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  निकाली निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

कडेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात पिण्याच्या पाईपलाईन कामाचे नुकतेच भुमीपुजन पार पडले. माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कार्यक्रमाने शिक्षकांसह विद्यार्थीही भावनिक झाले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुभाष देशमुखे यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.

कार्यक्रमास मुख्याध्यापक सुरेश जाधव, प्रशांत कानवडे,प्रशांत ओसवाल, अॅड.हरिष पालकर,स्वेजीत गायकवाड,ज्ञानेश्वर शिंदे,विक्रम शिंदे, अॅड. प्रशांत यादव,आप्पा रासकर,किरण भस्मे,प्रमोद कराडकर,दत्ता कारंडे, गणेश देशमुखे,शिवम् तडसरे यांची उपस्थिती होती. विद्यालयातील शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

महात्मा गांधी विद्यालयाने कडेगावच्या शैक्षणिक प्रगतीत भर घालणारी कामगिरी केली आहे. गेली कित्येक वर्षे पिढ्यान पिढ्या या विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात अविरत सेवा बजावली आहे. ज्या विद्यालयाने लाखो विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत भक्कमपणे उभा केले त्या विद्यालयास आज माजी विद्यार्थ्यांच्या मदतीची गरज भासू लागली आहे. ही गरज ओळखून कडेगावच्या जागृती युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा खर्च उचलला. सध्या शाळेत १६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची असुविधा होती. मुख्याध्यापक सुरेश जाधव यांच्याशी चर्चा झाल्यावर शाळेचा माजी विद्यार्थी अभिजीत पवार, प्रशांत ओसवाल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेला शाळेच्या इतर माजी विद्यार्थ्यांची साथ मिळाली. हे काम पुर्ण झाल्यावर विद्यालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  मार्गी लागेल.

यावेळी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वामी विवेकानंदांची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे विचार सांगणारे कॅलेंडर वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुभाष देशमुखे, विक्रम शिंदे, प्रशांत ओसवाल यांनी मनोगत व्यक्त केले. आभार मुख्याध्यापक सुरेश जाधव यांनी मानले.

परदेशातही उत्सुकता

महात्मा गांधी विद्यालयाचा माजी विद्यार्थी अभिजीत पवार सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेत आहे. सातासमुद्रापार जाऊनही त्याचे विद्यालयाशी भावनिक नाते आजही घट्ट आहे. त्याच्या सहकार्याने पार पडत असलेला हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी तो ऑनलाईन होता.त्याने या कार्यक्रमातील प्रत्येक क्षण परदेशात बसून अनुभवला. (समाप्त)

______________________________________________________________________________

जाहिरात

शालेय व व्यावसायिक कौशल्ये, मानसिक आरोग्य, लाईफ स्टाईल, नेतृत्व विकास, स्वत्व विकास, व्यक्तिमत्व विकास, नातेसंबंध, संवाद तंत्र, स्पर्धा परीक्षा तंत्र, लेखन कौशल्ये या व अश्या प्रकारच्या सर्व विषयावरील संशोधन, प्रशिक्षण, समुपदेशन यासाठी:

सेल्फहूड (संपर्क:८६९८६६२२३३  इमेल: info@selfhood.in)

2 thoughts on “माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने कडेगावच्या महात्मा गांधी विद्यालयात पाईपलाईनचे भूमिपुजन

 • January 5, 2017 at 10:01 am
  Permalink

  कडेगाव- पलुस लाईव्हने दोन्ही तालुक्यांच्या प्रगतीत भर टाकणारी नवी क्रांती घडवली आहे.सर्वसमावेश बातम्यांसह विश्वासार्हता जपणारे माध्यम म्हणून कडेगाव-पलूस लाईव्ह नावारूपास येत आहे….

 • January 5, 2017 at 10:15 am
  Permalink

  या चांगल्या कार्यास प्रसिद्धी दिल्याबद्दल आपल्या चॅनेलचे धन्यवाद.
  चॅनेलच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!
  आपल्या सर्व टीम चे आभारी आहोत.

Comments are closed.

माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने कडेगावच्या महात्मा गांधी विद्यालयात पाईपलाईनचे भूमिपुजन

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
2
Read previous post:
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ‘गुगल’ कडून गौरव

मुंबई : पहिली मुलींसाठी शाळा काढलेल्या आणि महिला म्हणून मोठी कामगिरी केलेल्या सावित्रीबाई फुले यांचा गौरव गुगलने डूडलच्या माध्यमातून केला

Close