कडेगावमध्ये विश्वस्तांचे शिबीर संपन्न0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): येथील नगरपंचायत सभागृहामध्ये काल ‘विश्वस्तांचे शिबीर’ पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. आर. पाटील होते.

मार्गदर्शनपर बोलताना अॅड. आश्रफ इसाक इनामदार यांनी विश्वस्त संस्थांचे महत्व व योगदान याविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमामध्ये मा. धर्मादाय आयुक्त यांनी विश्वस्त संस्थांचे व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, अॅड.  बी. डी. शिंदे व अॅड.  म्हेत्रे यांची विश्स्वत संस्थांची वेगवेगळ्या संदर्भातून मार्गदर्शन करणारी भाषणे झाली.

शिबिराचे प्रास्ताविक अॅड. सतीश लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. जमादार (गुरुजी) यांनी केले.

आभारप्रदर्शन कडेगावचे माजी सरपंच विजय शिंदे यांनी केले.

सध्या सुरु असलेल्या विश्वस्त संस्थाविषयक विविध कायदेशीर बदलांच्या अनुषंगाने असे शिबीर कडेगावमध्ये आयोजित केल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.


जाहिरात

शालेय व व्यावसायिक कौशल्ये, मुलांच्या अभ्यासातील समस्या, मानसिक आरोग्य, लाईफ स्टाईल, नेतृत्व विकास, स्वत्व विकास, व्यक्तिमत्व विकास, नातेसंबंध, पालकांच्या समस्या, संवाद तंत्र, स्पर्धा परीक्षा तंत्र, लेखन कौशल्ये या व अश्या प्रकारच्या सर्व विषयावरील संशोधन, प्रशिक्षण, समुपदेशन यासाठी:

सेल्फहूड (संपर्क:८६९८६६२२३३  इमेल: info@selfhood.in)

Leave a Reply

Your email address will not be published.

कडेगावमध्ये विश्वस्तांचे शिबीर संपन्न

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने कडेगावच्या महात्मा गांधी विद्यालयात पाईपलाईनचे भूमिपुजन

कडेगाव (सदानंद माळी): क्षारयुक्त पाणी...कालांतराने जीर्ण झालेली पाण्याची टाकी...त्या पाण्यावर अवलंबून कडेगावचे भवितव्य. महात्मा गांधी विद्यालयाचे हे वास्तव....ज्या विद्यालयाने जगाच्या

Close