युवकांच्या एकजुटीतून कडेगावात तयार होतोय चित्रपट…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव  : चित्रपट हा  आता केवळ पुण्या-मुंबईच्या मक्तेदारीचा विषय राहिला नाही. महाराष्ट्राच्या कानाकोप-याच्या ग्रामीण भागातही दर्जेदार निर्मिती होतेय. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील चार मित्रांनी एकत्र येऊन आपल्या वैचारिक आणि मैत्रीच्या विश्वासावर अल्पावधीत चित्रपट निर्मिती ला सुरुवात केली आहे.
त्यांनी चित्रपटाची कथा रचली आणि त्याप्रमाणे त्याचा पुढचा प्रवास सुरु झाला. पंकज मोहिते आणि सनी ह्या दोघांनी कथेमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. कथा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यातला उत्साह आणखी वाढलाय. योगेश यादव आणि सनी आपल्या अभिनयाचे कौशल्य या चित्रपटात साकारणार आहेत. विक्रम कांबळे हा ह्या सर्व निर्मिती प्रक्रियेत आपले व्यवस्थापन कौशल्य दाखवणार आहे. 
त्यांच्या ह्या चित्रपट निर्मिती कंपनीचे नाव त्यांनी स्वतःला साजेसेच ठेवले आहे- ‘फोर लायन एन्टरटेनमेंट’. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रितम अभंग करणार आहे हे ह्या निमित्ताने कंपनीने घोषित केले आहे. निर्मिती व प्रस्तुतीची कामे लवकर सुरू होतील, ऑडीशन सुरू होतील. नंतर शुटींग इथे सुरू होइल आणि लवकरच प्रितम अभंग पुढील कामे सुरू करतील.
पुढच्या वाटचालीस युवासेना पृथ्वीराज पवार (भैया), राहुल चन्ने, अमोल पवार, महादेव चौगुले, कुलदीप रास्कर, रोहित पाटील, वैभव डवरी, प्रदिप पवार, दिगंबर चन्ने, शेखर चन्ने, अक्षय चन्ने, इकबाल मुलानी, सागर रूपनर, युवराज जरग, हेमंत घाडगे, नागेश कदम (नाना), अक्षय काटरे (सर), प्रविण काटरे, प्रतिक पाटील, विजय मोहिते, जय मोहिते, संग्राम भिंगारे, जिंतेंद्र रजपूत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

जाहिरात

शालेय व व्यावसायिक कौशल्ये, मुलांच्या अभ्यासातील समस्या, मानसिक आरोग्य, लाईफ स्टाईल, नेतृत्व विकास, स्वत्व विकास, व्यक्तिमत्व विकास, नातेसंबंध, पालकांच्या समस्या, संवाद तंत्र, स्पर्धा परीक्षा तंत्र, लेखन कौशल्ये या व अश्या प्रकारच्या सर्व विषयावरील संशोधन, प्रशिक्षण, समुपदेशन यासाठी:

सेल्फहूड (संपर्क:८६९८६६२२३३  इमेल: info@selfhood.in)

युवकांच्या एकजुटीतून कडेगावात तयार होतोय चित्रपट…!!!

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये विश्वस्तांचे शिबीर संपन्न

कडेगाव (सदानंद माळी): येथील नगरपंचायत सभागृहामध्ये काल 'विश्वस्तांचे शिबीर' पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर.

Close