नव्या पिढीने ध्येयवादी जीवन जगायला हवे-विनायक औंधकर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : नव्या पिढीने संघर्षाच्या सामना करत उच्चशिखर गाठण्यासाठी ध्येय्यवादी जीवन जगले पाहिजे. त्यासाठी स्वामी विवेकानदांच्या प्रेरणादायी विचारांची जपणूक करायला हवी असे प्रतिपादन कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी केले. 

नुकत्याच झालेल्या राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून युवा जागृती प्रतिष्ठानच्यावतीने कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

प्रतिष्ठानचे अभिजीत पवार, प्रशांत कानवडे, मनोज पालकर,प्रशांत ओसवाल यांच्या पुढाकाराने व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी स्वेजीत गायकवाड, विक्रम शिंदे, गणेश देशमुखे, विरेंद्र पाटील, विजय (पप्पू) शिंदे, किरण भस्में, आप्पा रास्कर.अमर मिसाळ,किरण डांगे,बाबु डोगंरे ,युवराज जरग,रोहीत कराडकर, अमोल ग्रामोपाध्ये, गणेश शिंदे, आंशिष वांगीकरण, युवराज जरग, दिलीप पवार सर, प्रदीप कोळी,अनिल माळी यांची उपस्थिती होती.

औंधकर म्हणाले, शालेय जीवनातच भविष्यातील आपल्या कार्यकर्तृत्वाचा पाया भक्कम होतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सजगपणे आपली वाटचाल ठरवणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंदांनी जे विचार मांडले त्या विचारांना आत्मसात करून आपण वाटचाल केल्यास निश्चित यशाच्या शिखरापर्यंत पोहचूू शकतो. युवा जागृती प्रतिष्ठाणचे कार्य असेच प्रेरणादायी आहे. समाजात नव्या पिढीला योग्य दिशा दाखवण्यासाठी युवा जागृती प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे.

व्याख्यानापुर्वी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. स्वेजित गायकवाड यांच्या हस्ते मिरवणूकीचा शुभारंभ झाला. विक्रम शिंदे यांच्या हस्ते प्रेरणादायी पुस्तकांचे शहरात वाटप करण्यात आले. सुत्रसंचलन भरत कदम यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुरेश जाधव यांनी मानले.

*कराड परिसरातही समाजउपयोगी कार्य*

मुख्याधिकारी औंधकर यांच्या हस्ते युवा जागृती प्रतिष्ठानच्या वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला. ते म्हणाले, युवा जागृती प्रतिष्ठानने कडेगावसह कराड परिसरातही चांगले कार्य सुरू केले आहे. समाजातील उपेक्षितांना मदत करून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न निश्चित मोठे कार्य उभा करेल.

नव्या पिढीने ध्येयवादी जीवन जगायला हवे-विनायक औंधकर

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
युवकांच्या एकजुटीतून कडेगावात तयार होतोय चित्रपट…!!!

कडेगाव  : चित्रपट हा  आता केवळ पुण्या-मुंबईच्या मक्तेदारीचा विषय राहिला नाही. महाराष्ट्राच्या कानाकोप-याच्या ग्रामीण भागातही दर्जेदार निर्मिती होतेय. सांगली जिल्ह्यातील

Close