‘मनीकेअर’ गुंतवणूक क्षेत्रात आर्थिक क्रांती घडवेल: गुंतवणूक तज्ञ योगेश प्रभू यांचे प्रतिपादन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कराडः  नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल झाला आहे. या बदलांचा अभ्यास करून आपल्या कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी व सुरक्षितता वाढवण्यासाठी तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेण महत्त्वाचे आहे. यात ‘मनीकेअर’ महत्वाची भूमिका पार पाडत नवी अर्थक्रांती घडवेल, असा विश्वास आयसीआयसीआय प्रुडेन्शियल चे क्लस्टर हेड योगेश प्रभु यांनी व्यक्त केला.

कराड येथील मनीकेअर फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेबसाईटचे उदघाटन, ‘साप्ताहिक लोकस्वराज्य’च्या म्युच्युअल फंड विशेषांकाचे प्रकाशन, तसेच गुंतवणूक मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. सेल्फहुडचे डायरेक्टर डॉ. गोविंद धस्के, माजी मुख्याध्यापक दमामे, प्रा. एम.डी. डाके यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास कराड परिसरातील डॉक्टर, व्यापारी, निवृत्त अधिकारी, शिक्षक, बँक अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थिती लावत आपल्या शंका विचारल्या.

प्रभू म्हणाले, सुरक्षित आणि योग्य गुंतवणूक हा विषय सध्या प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे. आपण आयुष्यभर कष्टाने जे कमवतो त्याचा योग्य मोबदला मिळून सर्व गुंतवणूक सुरक्षित रहावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. यासाठी मनीकेअर फायनान्शियल सर्व्हिसेससारख्या संस्थेचा सल्ला घेणे गरजेचे आहे आणि बदलत्या काळात श्री. मनोज डाके यांच्यासारखे ‘फायनान्शियल डॉक्टर’ च महत्वाची भूमिका बजावणार आहेत असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीच्या व्याख्यानामध्ये सेल्फहूड चे संस्थापक संचालक डॉ. गोविंद धस्के यांनी ‘गुंतवणूकीचे मानसशास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. गुंतवणूक करतानाची मानसिकता व सुरक्षितता या दोन्ही विषयावर त्यांनी विस्तृत शास्त्रीय माहिती दिली. श्री. मनोज डाके यांनी मनीकेअर फायनान्शियल सर्व्हिसेस मार्फत सामान्य गुंतवणूकदार व त्यांच्या मानसिक आरोग्याचा व सुरक्षितपणाच्या भावनेला दिलेला आदर कौतुकास्पद असल्याचे डॉ. धस्के यांनी नमूद केले.
मनोज डाके म्हणाले, नोटाबंदीमुळे आज समाजासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक करत गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता. यापुढेही असे नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित करून गुंतवणूक विषयावर मार्गदर्शन घेण्यासाठी पुढाकार घेणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. कॅशलेस इकॉनॉमी मध्ये उतरत असताना ‘मनिकेअर’ ग्राहकाभिमुख व एथिकल सेवा ह्या नवीन वेबसाईट व इतर मोबाईल वरील सुविधा यांचा  वापर करून  यापुढेही देत राहील असे म्हटले.
प्रा. मारुती डाके (सर), प्रा. मीनाक्षी डाके, तसेच सौ. दीप्ती डाके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘मनीकेअर’ गुंतवणूक क्षेत्रात आर्थिक क्रांती घडवेल: गुंतवणूक तज्ञ योगेश प्रभू यांचे प्रतिपादन

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नव्या पिढीने ध्येयवादी जीवन जगायला हवे-विनायक औंधकर

कडेगाव : नव्या पिढीने संघर्षाच्या सामना करत उच्चशिखर गाठण्यासाठी ध्येय्यवादी जीवन जगले पाहिजे. त्यासाठी स्वामी विवेकानदांच्या प्रेरणादायी विचारांची जपणूक करायला

Close