इच्छुकांची तिकिटासाठी तर नेत्यांची बंडखोरी टाळण्यासाठी ‘फिल्डिंग’0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

​कडेगाव (सदानंद माळी): पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला आता काही तासात प्रत्यक्ष सुरुवात होत आहे.

जाहीर आरक्षणाप्रमाणे काँग्रेस आणि भाजपसारख्या पक्षातून आपल्यालाच कशी उमेदवारी मिळेल यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे तर बंडखोरी टाळण्यासाठी इच्छुकांना न दुखवता आपल्याला हव्या त्या उमेदवाराच्या नावावर कसे एकमत करायचे, यासाठी पक्ष नेतृत्वाकडून चुरशीचे प्रयत्न चालू आहेत.

कोणत्या पक्षात किती प्रमाणात बंडखोरी होते, यावरच आता पुढील चित्र अवलंबून आहे. नुकत्याच झालेल्या कडेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये  थोड्या मतांनी भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. आता पराभवाचे उट्टे भाजप कसे काढतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कडेगाव पंचायत समिती जिल्हा परिषद गटांचे आरक्षण असे :

कडेगाव पंचायत समिती

जिल्हा परिषद गट

तडसर – ओबीसी महिला

कडेपुर – सर्वसाधारण

देवराष्ट्रे – सर्वसाधारण महिला

वांगी – सर्वसाधारण महिला

पंचायत समिती गण

तडसर – ओबीसी महिला

शाळगाव – ओपन महिला

कडेपुर – ओपन महिला

हिंगणगाव बु. – सर्वसाधारण खुला

नेवरी – ओबीसी पुरष

वांगी – मागासवर्गीय पुरुष

देवराष्ट्रे – ओपन महिला

चिंचणी – सर्वसाधारण पुरुष


 

इच्छुकांची तिकिटासाठी तर नेत्यांची बंडखोरी टाळण्यासाठी ‘फिल्डिंग’

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव व तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कडेगाव (प्रतिनिधी):  कडेगाव व तालुका परिसरात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कडेगाव मधील मुख्य ध्वजारोहण नूतन नगराध्यक्षा आकांक्षा

Close