पलूसमध्ये पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस (प्रतिनिधी): पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत पलूस शहर व तालुक्यामध्ये अतिशय जबाबदार पद्धतीने व उत्साहात लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला.

सर्व राजकीय पक्षांनी तसेच सरकारी कार्यालये व शाळांनी उत्स्फुर्तपणे प्रचार केल्याने या लसीकरण मोहिमेंस चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसते.

पलूसचे उपनगराध्यक्ष विक्रम पाटील यांनी स्वतःच्या कुटुंबाचा आदर्श समोर ठेवत पुढाकार घेऊन सरकारी दवाखान्यात स्वतःच्या मुलीस प्रथम पोलिओ लसीकरण केले यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

श्री. पाटील  हे पलूस नगरपरिषदेमध्ये आरोग्य व स्वच्छता  समितीमध्ये असल्याने त्यांच्या सक्रीय व उत्स्फूर्त सहभागाचे महत्व आहे.

 

या पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत पहिला डोस रविवारी २९ जानेवारीस देण्यात आला असून दुसरा डोस २ एप्रिल रोजी उपलब्ध करण्यात येणार आहे. मोहिमेस १०० टक्के प्रतिसाद देण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


पलूसमध्ये पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
इच्छुकांची तिकिटासाठी तर नेत्यांची बंडखोरी टाळण्यासाठी ‘फिल्डिंग’

​कडेगाव (सदानंद माळी): पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला आता काही तासात प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. जाहीर आरक्षणाप्रमाणे काँग्रेस

Close