कडेगावमध्ये मराठा क्रांती महामोर्चाचा चक्काजाम शांततेत0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (प्रतिनिधी): मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने आज राज्यभर चक्काजाम आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. कडेगावमध्ये मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण चक्काजाम आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

मोर्चेकरी कार्यकर्त्यांनी सुरवातीपासून निवेदन सक्षम सरकारी अधिकाऱ्याने स्वीकारावा असा आग्रह धरल्याने थोडासा तणाव निर्माण झाला होता. परंतु, तहसीलदार शेटे यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता निवेदन स्वीकारले आणि तणाव निवळला. चक्काजाममुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यांनी पूर्ण बंदोबस्त ठेवला होता.

छाया: सागर वायदंडे

कडेगावमध्ये मराठा क्रांती महामोर्चाचा चक्काजाम शांततेत

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूसमध्ये पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात

पलूस (प्रतिनिधी): पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत पलूस शहर व तालुक्यामध्ये अतिशय जबाबदार पद्धतीने व उत्साहात लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला.

Close