स्वराज्य फौंडेशन यांच्या वतीने ‘नागठाणे भुषण’ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न0 मिनिटे
पलूस (प्रतिनिधी) : पलूस तालुक्यातील स्वराज फौंडेशन यांच्या वतीने २०१६-२०१७ च्या ‘नागठाणे भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या अंतर्गत देण्यात आलेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत.
सांप्रदायिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री. तुकाराम दत्तु पाटोळे यांना पुरस्कार देण्यात आला.
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे हिंम्मत जगन्नाथ पाटील, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे गणपतराव धोंडीराम पाटील यांना पुरस्कार देण्यात आला.
आदर्श विद्यार्थिनी वैष्णवी विकास थोरात ( राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय नागठाणे ) व प्रतिक्षा उत्तम सुतार ( माध्यमिक विद्यालय नागठाणे ) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी स्वराज्य फौंडेशन चे पदाधीकारी, ग्रामस्थ व सरपंच, उपसरपंच यांच्या बरोबर इतर मान्यवर उपस्थितीत होते.