पलूस-कडेगावमध्ये ‘मोदी फिव्हर’0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (प्रतिनिधी) : काँग्रेससारख्या बलाढ्य शत्रूशी नेहमीच अतिशय चुरशीची लढत देणाऱ्या माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्हा भाजपची धुरा हाती घेतल्यामुळे गेल्या काही वर्षात केवळ मोजक्या मतदारसंघात अस्तित्व असलेल्या भाजपमध्ये चैतन्य पसरले आहे.

तसा पलूस- कडेगाव मतदार संघात हा पक्षच दिसत नव्हता. आता मात्र बाबांच्या नेतृत्वामुळे अनेक युवा नेते आणि कार्यकर्ते पंतप्रधान मोदींचा गजर करू लागलेत. काँग्रेसचे आणि विशेषतः कदम गटाचे विरोधक तर आहेतच, परंतु मोदींच्या व्यक्तिमत्वावर आणि कार्यशैलीवर खुश असणारे अनेक युवा कार्यकर्ते आज बाबा आणि युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसशी दोन हात करण्यास सज्ज झालेत.

येऊ घातलेली निवडणूक ही एक प्रकारे विधानसभेची रंगीत तालीमच ठरणार आहे. या निकालावरून ग्रामीण भागात काँग्रेसच्या वर्चस्वाला कोणी किती हादरा दिला, हे स्पष्ट होणार आहे.


पलूस-कडेगावमध्ये ‘मोदी फिव्हर’

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
बाबा-अण्णांनी केली काँग्रेसला घेरण्याची जोरदार तयारी

कडेगाव (सागर वायदंडे) : येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला टक्कर देण्यासाठी कडेगाव-पलूसमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती

Close