नाना पाटेकर यांना ‘गुरु बसव पुरस्कार’ प्रदान0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

बिदर : येथील बसव सेवा प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणारा ‘गुरु बसव पुरस्कार’ प्रख्यात अभिनेते व समाजसेवी नाना पाटेकर  यांना आज बिदर येथे मोठ्या समारंभात प्रदान करण्यात आला.

विदर्भ-मराठवाड्यातील शेकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या सामाजिक कामाबद्दल पाटेकर यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे असे संयोजन समितीने सांगितले. रोख ५१ हजार रुपये व तत्वज्ञ संत जगतगुरु बसवेश्वर यांची मूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ट्रस्टच्या पुरस्कार निवड समिती मध्ये आक्का अन्नपूर्णा आणि बसवराज धन्नुर यांच्या मुख्य समावेश होता.

दरवर्षी बसव सेवा प्रतिष्ठान मार्फत ‘वचन विजयोत्सव’ या तीन दिवसीय लिंगायत धर्मियांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी हा उत्सव ९ ते ११ फेब्रुवारीला साजरा होत आहे.

महान संत, समाज सुधारक, तत्वज्ञ संत बसवेश्वर यांच्या साहित्य व तत्वज्ञानावर वेगवेळ्या अभ्यासकांकडून या सोहळ्यामध्ये विचार सादर केले जातात.

मानाचा समजला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार या पूर्वी न्यायमूर्ती शिवराज पाटील, बाबा आमटे, व अण्णा हजारे यांना प्रदान करण्यात आला आहे.


नाना पाटेकर यांना ‘गुरु बसव पुरस्कार’ प्रदान

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे उद्या आयोजन

कडेगाव (सागर वायदंडे ): कडेगाव येथील अद्ययावत डॉ. रेणुशे हॉस्पिटल व लुपिन रेस्पिरा ली. मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने येथे मोफत

Close