कडेगावमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): लिंगायत धर्मियांचा व शैवपूजकांचा मुख्य उत्सव मानला जाणारे महाशिवरात्री पर्व कडेगाव व परिसरात उत्साहात साजरे झाले.

अगदी सकाळपासून येथील जुन्या महादेव मंदिरात अनेक शिवभक्तांनी  दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अनेक कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने व्यवस्था ठेवत येथे शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आयोजित केले होते. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच शालेय मुलामुलींचा ग्रंथवाचनामध्ये हिरीरीने सहभाग होता, त्याबद्दल अनेक लिंगायत धर्मीय शरणार्थीनी समाधान व्यक्त केले.

उत्सवाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  गावातील मुख्य मंदिरासोबतच एम आय डी सी परिसरातील शिवमंदिरामध्ये जाऊन काही भक्तांनी दर्शन घेतले. शनिवारी महाप्रसादानंतर उत्सवाची सांगता होईल.


कडेगावमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नाना पाटेकर यांना ‘गुरु बसव पुरस्कार’ प्रदान

बिदर : येथील बसव सेवा प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणारा 'गुरु बसव पुरस्कार' प्रख्यात अभिनेते व समाजसेवी नाना पाटेकर  यांना आज

Close