भावपूर्ण वातावरणात विजय संगीत महोत्सव २०१७ संपन्न0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): स्वर्गीय विजय (दादा) देशमुख बहुद्देशीय संस्था, कडेगाव यांनी आयोजित केलेला ‘विजय संगीत महोत्सव २०१७’ येथे १८ व १९ फेब्रुवारी ला संपन्न झाला.  स्वर्गीय विजय (दादा) देशमुख यांच्या जयंती निम्मित्त अयोजीत करण्यात येणाऱ्या या संगीत महोत्सवाचे हे दुसरे वर्ष.

मुख्य कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले यांना ‘कलारत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विजय संगीत महोत्सवाची सुरवात कडेगाव परिसरामध्ये शास्त्रीय संगीताची परंपरा जिवंत ठेवणारे गुरुवर्य अशोक कुलकर्णी यांच्या गायनाने झाली. सोबत मुंबईच्या अमृता मोरे यांचे सतारवादन आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी हिंदी मराठी गीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ.दत्ता कुंभार , संज्योती जगदाळे, निखील मधाळे, व मोहिनी मुळीक यांचे सादरीकरण झाले.

यावेळी भाजप चे जिल्हाध्यक्ष मा. पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष मा. संग्रामसिंह देशमुख,  मा. चंद्रसेन देशमुख (भाऊ), व युवानेते मा. धनंजय (भैय्या ) देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास कडेगाव व परिसरातील तसेच जिल्ह्यामधून अनेक संगीत रसिक आवर्जून आले होते.

या कार्यक्रमाचे संयोजन स्व. विजय (दादा) देशमुख बहुद्देशीय संस्था, लिबर्टी ग्रुप, व स्वर्गीय विजय (दादा) देशमुख प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.


 

भावपूर्ण वातावरणात विजय संगीत महोत्सव २०१७ संपन्न

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी

कडेगाव (सागर वायदंडे): लिंगायत धर्मियांचा व शैवपूजकांचा मुख्य उत्सव मानला जाणारे महाशिवरात्री पर्व कडेगाव व परिसरात उत्साहात साजरे झाले. अगदी

Close