'परीक्षेच्या ताणावर मात कशी करायची ?' कार्यशाळेचे रविवारी कडेगावमध्ये आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): पालक, शिक्षक आणि परीक्षेला सामोरे जाणारे असंख्य विद्यार्थी यांच्या मदतीसाठी 'फोक्स' या सामाजिक संस्थेतर्फे ' परीक्षेच्या ताणावर मात कशी करायची ?' या विषयावर मोफत कार्यशाळेचे कडेगाव येथे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अर्जुन धस्के यांनी दिली.

ही कार्यशाळा कडेगावच्या नगरपंचायत सभागृहामध्ये येत्या रविवारी १२ मार्च ला सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत संपन्न होईल.

'सेल्फहूड' चे संचालक व जगप्रसिद्ध जीवन कौशल्य तज्ञ डॉ. गोविंद धस्के व फोक्स संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संशोधक सौ. अनामिका गोविंद धस्के हे या कार्यशाळेत परीक्षेचा ताण  कसा समजून घ्यावा व त्यावर कशी मात करावी या विषयावर विविध प्रकारच्या मानसशास्त्रीय पद्धती वापरून मार्गदर्शन करतील.

De Apcalis sx 20mg oral jelly prijs, werking en online ervaringen

कार्यशाळेचे प्रायोजक ' भारत कुंभार & असोसिएटस, पुणे ' चे भारत कुंभार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की परीक्षेच्या काळामध्ये येणारा ताण तो ज्यावेळेला उच्च पातळीवर असतो तेव्हाच जर तज्ञांच्याकडून मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतील. या कार्यशाळेचा उद्देश कडेगाव व परिसरातील विद्यार्थ्यांना, पालकांना तसेच शिक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तणाव मुक्ती बद्दलचे मार्गदर्शन मिळावे हा असून सर्वांनी कार्यशाळेमध्ये सामील व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

फ्रॅटर्निटी ऑफ लोकल नॉलेज सेव्हीयर्स (फोक्स) संस्थेचे सचिव मनोज डाके यांनी या कार्यशाळेसाठी info@globalfolks.in किंवा ९८१९१७९३७७ या फोन क्रमांकावर आपले नाव, शिक्षण, व्यवसाय, आणि मोबाईल नंबर पाठवून त्वरीत नावनोंदणी करावी अशी माहिती दिली.


 

'परीक्षेच्या ताणावर मात कशी करायची ?' कार्यशाळेचे रविवारी कडेगावमध्ये आयोजन

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव पोलिसांचा दणदणीत विजय

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगाव पोलीस विरुद्ध कडेगाव पत्रकार यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यात पोलीस संघाने विजय मिळवला. कडेगाव पत्रकारांनी निर्धारित षटकांमध्ये

Close