कडेगाव पोलिसांचा दणदणीत विजय0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कडेगाव (सागर वायदंडे): कडेगाव पोलीस विरुद्ध कडेगाव पत्रकार यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यात पोलीस संघाने विजय मिळवला.
कडेगाव पत्रकारांनी निर्धारित षटकांमध्ये ५ बाद ५९ धावा केल्या परंतु कडेगाव पोलिसांनी विजयासाठीच्या ६० धावा २ षटके राखुन व ३ गड्यांच्या बदल्यात बनवल्या.
कडेगाव पोलिस संघाचे नेतृत्व सहाय्यक पोलिस निरिक्षक उमेश दंडीले यांनी केले तर कडेगाव पत्रकार संघाचे नेतृत्व संतोष कणसे यांनी केले. अत्यंत खेळीमेळीत आणि खिलाडू वृत्तीने पार पडलेल्या या सामन्याचा आनंद दोन्ही संघानी तसेच प्रेक्षकांनी घेतला. पत्रकार संघाचे दिग्गज खेळाडू गैरहजर होते तरीही सामना चुरशीचा झाला.

कडेगाव पोलिसांचा दणदणीत विजय

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भावपूर्ण वातावरणात विजय संगीत महोत्सव २०१७ संपन्न

कडेगाव (सागर वायदंडे): स्वर्गीय विजय (दादा) देशमुख बहुद्देशीय संस्था, कडेगाव यांनी आयोजित केलेला 'विजय संगीत महोत्सव २०१७' येथे १८ व

Close