देशमुख विरुद्ध देशमुख: संख्याबळाची लढाई सुरूच0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली (सदानंद माळी) : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोचली असली तरी संख्याबळाची लढाई अजूनही सुरूच आहे. भाजपा कडून संग्रामसिंह देशमुख तर कांग्रेस कडून सत्यजीत देशमुख यांच नाव आघाडीवर आहे.

भाजपा आणि कांग्रेस मध्ये संख्याबळाची जुळवा-जुळवीचे प्रयत्न जोरदारपणे सुरु  असून भाजपचे जिल्ह्याध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि कांग्रेसकडून माजी मंत्री पतंगराव कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सध्याची संख्याबळाची स्थिती पाहता शिवसेना आणि स्वा. शेतकरी संघटनेकडे सत्तेच्या चाव्या असल्याचे दिसते.

अंतिम चित्र २१ तारखेला होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.

आजच्या घटकेला भाजपचे संख्याबळ पक्षाच्या २५ सदस्यांसह  रयत विकास आघाडीच्या ४ सदस्यांमुळे २९ आहे.  तर, कॉंग्रेस व मित्रपक्षांचे संख्याबळ २७ आहे ज्यामध्ये कॉंग्रेसचे १०, राष्ट्रवादीचे १४, घोरपडे गटाचे २ आणि अपक्ष १ सदस्य आहेत.

बहुमतसाठी ३१ सदस्यांची आवश्यकता आहे.  ३ सदस्यांसह  शिवसेना आणि एका सदस्यांसह स्वा. शेतकरी संघटनेची भूमिका अजूनही सुस्पष्ट नसल्याने  या दोन्ही पक्षांची भूमिका अध्यक्ष निवडीत निर्णायक ठरणार आहे.

जिल्हापरिषदेच्या अध्यक्षनिवडीच्या संख्याबळाच्या लढाईमुळे संपूर्ण जिल्हा व पश्चिम महाराष्ट्राची उत्सुकता ताणली गेली आहे.


देशमुख विरुद्ध देशमुख: संख्याबळाची लढाई सुरूच

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तडसर ग्रामपंचायतीला 'स्मार्ट व्हिलेज' पुरस्कार

कडेगाव (सागर  वायदंडे):  विष्णुदास भावे नाट्यमंदिर सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात कडेगाव तालुक्यातून  तडसर ग्रामपंचायतीस  स्मार्ट व्हिलेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Close