मायक्रोफायनान्स कंपनी विरोधात जनता क्रांती दलाचा मोर्चा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): जनता क्रांती दलाचे उपाध्यक्ष आकाश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आज कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालावर मायक्रोफायनान्स कंपनी विरोधात मोर्चा काढण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष असताना जनता क्रांती दलाने आज या मोर्च्याचे आयोजन केले होते ज्यामध्ये परिसरातील महिलांचा लक्षणीय सहभाग होता. निषेध नोंदवत मोर्चेकरी गटाने आपले निवेदन प्रांत कार्यालयास सादर केले.

शेती कर्जमाफीची मागणी आणि नोटबंदी पश्चात परिस्थितीमध्ये मायक्रोफायनान्स संबंधी धोरण निश्चित करण्यात यावी यासाठी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यात, अशी आंदोलने गेले काही आठवडे सुरु आहेत. परंतु, सधन समजल्या जाणऱ्या दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात अश्या प्रकारचे आंदोलन निश्चितच लक्षवेधी आहे. (समाप्त)

छाया: साभार


मायक्रोफायनान्स कंपनी विरोधात जनता क्रांती दलाचा मोर्चा

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सांगली जि. प. मध्ये भाजप जिंकले: पृथ्वीराज देशमुखांची खेळी यशस्वी

सांगली (सदानंद माळी/ सागर वायदंडे/ विठ्ठल धर्माधिकारी): सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हापरिषदेच्या पदाधिकारी निवडीच्या नाट्यावर आज अखेर पडदा

Close