सांगली जि. प. मध्ये भाजप जिंकले: पृथ्वीराज देशमुखांची खेळी यशस्वी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली (सदानंद माळी/ सागर वायदंडे/ विठ्ठल धर्माधिकारी): सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हापरिषदेच्या पदाधिकारी निवडीच्या नाट्यावर आज अखेर पडदा पडला. सर्व शक्यतांचा पाडाव करत भाजपचे संग्रामसिंह देशमुख अध्यक्षस्थानी तर उपाध्यक्षपदी  सुहास बाबर विराजमान झाले.

गेले दोन दिवस वेगवेगळ्या युत्यांच्या शक्यता वर्तवण्यात आल्याने तसेच शिवसेनेने आपली भूमिका अखेरच्या क्षणापर्यंत स्पष्ट न केल्याने अध्यक्षपदाच्या निवडीबाबत संदिग्ध परिस्थिती निर्माण झाली होती. माजी मंत्री पतंगराव कदम आणि जयंत पाटील यांनी एकत्रितपणे निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लावल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. परंतु, या सर्व सत्तासंघर्षामध्ये अखेर जिल्हा भाजप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुखे यांचे पारडे वरचढ ठरले.  नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे सत्यजित देशमुख यांचा १० मतांनी पराभव केला.

संपूर्ण जिल्ह्याची उत्सुकता काल रात्रीपासून ताणली गेली होती अशातच वेगवेगळी राजकीय समीकरणे समोर आल्याने नक्की कोण अध्यक्ष बनणार याविषयी सर्वांनाच कुतूहल होते. भाजपने सुरवातीपासून संग्रामसिंह देशमुख यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते.

आज सव्वा तीनच्या सुमारास झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर सर्व चर्चांना विराम देत संग्रामसिंह देशमुख अध्यक्षस्थानी तर सुहास बाबर उपाध्यक्षपदी विराजमान झाले. विजयाची बातमी कळताच सांगली मध्ये एकाच जल्लोष झाला. संग्रामसिंह देशमुख यांच्या गावी- कडेपूर- येथे जोरदार आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.

राज्याच्या वैचारीकतेचे आणि राजकारणाचे नाक समाजाला जाणाऱ्या सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच भाजपची सत्ता आल्याने इथून पुढे जिल्ह्याचे आणि पर्यायाने राज्याचे राजकारण कोणती वळणे घेते याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. (संपूर्ण)

छाया: साभार


सांगली जि. प. मध्ये भाजप जिंकले: पृथ्वीराज देशमुखांची खेळी यशस्वी

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
देशमुख विरुद्ध देशमुख: संख्याबळाची लढाई सुरूच

सांगली (सदानंद माळी) : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोचली असली तरी संख्याबळाची लढाई अजूनही सुरूच आहे. भाजपा

Close