आपल्या बातम्या… आपली नागरिक पत्रकारिता0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण स्मार्ट फोन घेऊन वावरत असतो. एरव्ही रोजची गरजेचा वस्तू बनलेला हाच मोबाईल आपल्याला आणखी एक शक्ती देतो. होय….शक्तीच !! आश्चर्य वाटले ना?

अतिशय साधा आणि सामान्य वाटणारा मोबाईलआपल्याला बनवू शकतो एक सजग ‘नागरिक पत्रकार’. ज्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची बातमी आम्हाला कळवू शकता आणि आम्ही ती खात्री करून प्रसिद्ध करू शकतो. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहितीची देवाण-घेवाण वेगात होणे शक्य आहे आणि आपण जर ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’ च्या माहिती प्रसारण चळवळी मध्ये सामील झालात तर आपणही या विधायक लोकशाही भक्कम करण्याऱ्या कृतीचा हिस्सा व्हाल.

आपण आपले लेख, बातम्या, इतर माहिती, कार्यक्रमाचे निमंत्रण इतर तक्रारींच्या बातम्या, जाहिराती (अटी लागू) पाठवा. आमच्या संपादकीय विभागाच्या सल्ल्याने प्रसारण निकष पार केलेय सर्व गोष्टी आम्ही अगदी सन्मानपूर्वक प्रसिद्ध करू.

आपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास ‘नागरिक पत्रकार’ बनवण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. पण, प्रशिक्षण नसले तरी आपल्याकडे असणाऱ्या मोबाईल च्या माध्यमातून आपण अगदी या क्षणापासून बातम्या देणे सुरु करू शकता. आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास ८३९०४४२२३३ किंवा इमेलद्वारे desk@kplivenews.com वर पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू. अगदी आपल्या नावानिशी.

मग सुरु करताय ना लिहायला ?


आपल्या बातम्या… आपली नागरिक पत्रकारिता

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
वांगीचे जयपाल उत्तमराव मोहिते ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी

वांगी (सदानंद माळी): वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही एस आय) तर्फे दिला जाणारा यंदाचा 'ऊसभूषण पुरस्कार' वांगी  (ता. कडेगांव) येथील जयपाल

Close