वांगीचे जयपाल उत्तमराव मोहिते ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

वांगी (सदानंद माळी): वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही एस आय) तर्फे दिला जाणारा यंदाचा ‘ऊसभूषण पुरस्कार’ वांगी  (ता. कडेगांव) येथील जयपाल उतमराव मोहिते यांना जाहीर झाला आहे.  पुरस्कार वितरण सोहळा मांजरी बुद्रुक (पुणे ) येथे येत्या २७ मार्चला होणार आहे.

मोहिते यांनी को ९२००५ या ऊस वाणाचे सुरू हंगामात हेक्टरी २३४.८४ टन उत्पादन घेतले आहे. त्यांना राज्यस्तरीय ऊसभूषण गटातील कै. वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना मोहिते म्हणाले, शेतात कष्ट केल्याने यश नक्कीच मिळते, काटेकोर  नियोजन व पाणी व्यवस्थापन यामुळे ऊसाचे विक्रमी उत्पादन शक्य झाले.

वसंतदादा  शुगर इन्स्टिट्यूटच्या इतर पुरस्कारामध्ये ‘उत्कृष्ट ऊस विकास अधिकारी’ पुरस्कार क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड सह. साखर कारखान्याच्या व्ही. डी. जाधव यांना जाहीर झाला आहे. याच कारखान्याच्या एस. पी. जाधव. यांना ‘उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापना’ चा पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘उत्कृष्ट चीफ इंजिनियर’ चा मानाचा समाजाला जाणारा पुरस्कार सोनहिरा सह. साखर कारखान्याच्या एस. जे. पाटील यांना जाहीर झाला आहे.

रोख बक्षीस रक्कम, मानचिन्ह, व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल विजेत्या शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


वांगीचे जयपाल उत्तमराव मोहिते ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मायक्रोफायनान्स कंपनी विरोधात जनता क्रांती दलाचा मोर्चा

कडेगाव (सदानंद माळी): जनता क्रांती दलाचे उपाध्यक्ष आकाश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आज कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालावर मायक्रोफायनान्स कंपनी विरोधात मोर्चा

Close