तासगावच्या पत्रकारांकडून द्राक्षाचं मुंबईत महाब्रँण्डींग0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई: तासगावचं नाव घेतल की डोळ्यासमोर उभ राहतं आराध्य गणपती मंदीर,तासगावची सर्कस, तमाशा, कला, क्रीडा ,सामाजीक ,सांस्कृतीक, शैक्षणिक, आर्थिक, नाट्य ,नृत्य. मात्र, तासगावची राज्यात सर्वात मोठी आठवण म्हणजे स्वर्गीय आर आर आबा व खासदार संजय काका यांची राजकीय कुस्ती. बेदाण्याची बाजारपेठ, द्राक्षपंढरी व तासगावची पत्रकारीता ! तासगावच्या या क्रान्तिकारकांच्या भूमीत अनेक दिग्गज जन्मले. तासगावच नाव त्यांनी सातासमुद्रापार नेलं. तासगावच्या मातीत जन्मलेल्या अनेक मंडळींनी पत्रकारीता डागाळून न देता ती जपली ,वाढवली व तीचा आलेख चढ़ता ठेवला.

त्यात सुभाष कुलकर्णी,नजरेतच एक वेगळी जरब असणारे विठ्ठल चव्हाण, तालुक्याची दशा आणि दिशा या सर्व  क्षेत्राचा बारीक अभ्यास असणारे आदरणीय रवीन्द्र माने  व सुनील गायकवाड़ ही जोड़गोळी, कोणत्या शब्दाची बातमी कशी करायची याचा सेन्स असणारे महावीर कुते, नविन पत्रकार घडवणारे पत्रकार ते खासदार संजय काकांचे स्वीय सहाय्यक असा प्रवास असणारे संजय माळी, निर्भिड पत्रकार ते संपादक असा खड़तर प्रवास करणारे अमोल पाटील, तुरचीच्या फोंड्या माळावरूंन सांगली गाठत पत्रकारीतेतच नव्हे तर सामाजिक, राजकीय कला,अभ्यासू व प्रभावी वक्तृत्व व सरस्वतीचा हात सदैव डोक्यावर असणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व कुलदीप देवकुले, अभ्यासू व समाजभान असणारे गजानन कुलकर्णी,आक्रमक पत्रकारितेसाठी काही काळ चर्चित जोड़ी तानाजी जाधव व संजय काळे,
जेष्ठ पत्रकार चंद्रकांत गायकवाड ज्यांनी कचरेवाडीतून विटा येथे बेडर पत्रकारीता सुरु करत नऊ वर्षाची तपस्या करुण साप्ताहीक वज्रधारीच रोपट लावल आणि ते  एखाद्या पतीव्रते प्रमाण वाढवल व त्याला जपत त्याचा वटवृक्ष केला. लिखाणात इतकी ताकत की एखाद्याच्या मृत्युनंतर त्यांच्या पेपरचा गठ्ठा मातीदिवशी ठेवावा. या समाजाचं आपण देण लागतो या भावनेतून कोणताही आविर्भाव न आणता सर्व जातिधर्माच्या लोकांची समाजकार्यासाठी मोट बांधनारे आधुनिक शिवाजी महाराज म्हणजे दत्तकुमार खंडागळे, राजकीय वार्तापत्रांचा बादशाहा दत्ता पाटील , शेवटी तासगावच्या पत्रकारीतेतल हसत खेळत व्यक्तिमत्त्व, प्रमोद चव्हाण. या सर्व मान्यवर पत्रकारांसह अनेक जणांनी तासगावची पत्रकारीता जपली आणि वाढवली.  पडदयामागून अनेकांना स्वतःला त्रास घेऊन मोठ केलं. मात्र समाज सुधारणेचा व समाज भानाचा वसा यांनी कधी सोडला नाही.

याचच आणखी एक विशेष चालतं बोलतं उदाहरण म्हणजे मुंबईत मंत्रालयात पत्रकारिता करणारे तासगावचे दोन सुपुत्र अमित काळे व अभिजीत झाम्बरे. जीवाच्या मुंबईत राहून द्राक्षपंढरी असणाऱ्या तासगावच्या द्राक्षाविषयी यांना सतत काळजी. हवामान बदलल तरी यांचे फोन गावाकडं यायचे. जसे घार उड़े आकाशी नजर तिची पिलापाशी या म्हणीप्रमाणे इथल्या शेतकऱ्यांच कष्ट यांनी पाहील होत.

दोन महिन्यापूर्वी यांच्या डोक्यात विचार आला तासगावच्या द्राक्षाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मुंबईत द्राक्षमहोत्सव भरवायचा. मात्र मुंबईत द्राक्षमहोत्सव आयोजित करणं साध सोप काम न्हवतं. असंख्य अडचणी होत्या. अधिवेशन सुरु होत. त्यात पत्रकारिता सांभाळत यासाठी दोघांनी दिवस रात्र एक केला. अगदी डिजीटल लावण्यापासून पाहुण्यांना नाश्ता देण्यापर्यन्त सगळी कामे केली .आणि शेवटी  २० मार्च ला मुंबईत मनोरा आमदार निवास परिसरात आकारास आला  तासगावच्या द्राक्षांचा द्राक्ष महोत्सव.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षाचे मुंबईत ब्रँण्डींग व्हावे या उद्देशाने द्राक्षभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अमित व अभिजीत या दोन तरुण पत्रकारानी आयोजित केलेल्या  या द्राक्षमहोत्सवाच  राज्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी उद्घाटन  करुन कौतुक केले. या महोत्सवात त्यांनी आर के, माणिक चमन, जंबो सीडलेस, सुपर सोनाका या जातीची द्राक्षे स्वताच्या खिशातील पैसे घालून खरेदी करत महोत्सवात आणली. महाराष्ट्रात पिकणाऱ्या विविध प्रकारच्या द्राक्षांची माहिती त्याची वैशिष्ट्ये या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

या महोत्सवास आमदार सुमनताई पाटील, आ.सुरेश खाडे, आ. जोगेंद्र कवाडे, आ.बाळासाहेब पाटील, आ.रामराव वडकुते, आ.ख्वाजा बेग, आ. संजय पुरम, आ.समीर कुणावार, आ.आनंद ठाकूर, आ.राहूल बोंद्रे, आ.बळीराम शिरस्कर आदी मान्यवरांनी भेट दिली. रविवार पर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

आम्हीही समाजाच देण लागतो या भावनेतूनच तासगावच्या द्राक्षाच मुंबईत ब्रँण्डींग व्हाव यासाठी खटाटोप केला. आजकाल पत्रकारांबदल चांगल बोलल जात नाही, लिहलं जात नाही. सर्वच क्षेत्राप्रमाणे यातही नालायक मंडळींचा भरणा झालाय असे बोलले जाते. काही नालायक असतीलही मात्र काही खेकड्याच्या प्रवृतीमुळे चांगली माणसं पडदयाआड राहतात. त्यांच्या चांगल्या कामाचा योग्य सन्मान होत नाही ही खंत कुठतरी राहते. तासगावच्या पत्रकारितेतल्या रथी-महारथींवर लिहताना कुठतरी कमी जास्त झाल असेल. मात्र पडदया मागून इतरांसाठी झटत त्यांना हीरो करणाऱ्या या रिअल हिरोंसाठी काही तोडक्या मोडक्या ओळी लिहाव्या असे वाटले म्हणून हा खटाटोप …!!!

आधारित: विनायक कदम यांचा ब्लॉग (vinayakkadamak5.blogspot.com)


One thought on “तासगावच्या पत्रकारांकडून द्राक्षाचं मुंबईत महाब्रँण्डींग

Comments are closed.

तासगावच्या पत्रकारांकडून द्राक्षाचं मुंबईत महाब्रँण्डींग

by admin वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
नवीन आर्थिक वर्ष…नवीन आर्थिक नियोजनाचा संकल्प : मनोज डाके

प्रत्येक वर्षी एप्रिल महिना सुरु झाला की सर्वच क्षेत्रात आगामी आर्थिक वर्षासाठी नियोजनास सुरुवात होते. त्यामध्ये विविध संस्था, व्यापारी वर्ग,

Close