डॉ.कणसे यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर नियुक्ती0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली (सदानंद माळी): महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठांना मागे टाकत आपले अव्वल स्थान कायम राखणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांची नियुक्ती  करण्यात आली आहे.  शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

डॉ. डी. जी. कणसे यांना त्यांच्या विशेष कामाबद्दल यापूर्वी  ‘राष्ट्रीय शिक्षक भूषण पुरस्कार’ देण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये तज्ञ समजले जाणारे डॉ. कणसे यांनी शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठाच्या विविध प्रकारच्या समित्यांमध्ये  यापूर्वी योगदान दिले आहे.

मुळचे सोनसळ येथील असणारे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांची काही आठवड्यांपूर्वी सांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठातील नियुक्तीबद्दल डॉ. कणसे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. भारती विद्यापीठाच्या डॉ.संतोष माने यांनी प्रसिद्धी विभागाद्वारे वरील माहिती दिली आहे.


डॉ.कणसे यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर नियुक्ती

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावच्या विकास प्रश्नांवर आ. मोहनराव कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कडेगाव (सागर वायदंडे): आपल्या मतदारसंघातील कडेगाव या नवनिर्मित नगरपंचायतीच्या विकास प्रश्नांकडे लक्ष देण्यात यावे यासाठी आमदार मोहनराव कदम यांनी मुख्यमंत्री

Close