लिंगायत धर्मीय युवकांसाठी वेबसाईट सुरु0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): लिंगायत धर्मीय युवकांसाठी पूर्णतः वाहिलेली वेबसाईट  www.lingayatyuva.com सुरु झाली असून या वेबसाईट तर्फे सर्व लिंगायत धर्मियांना लेख व इतर माहिती स्वरुपात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आधुनिक काळात लिंगायत युवकांच्या विकासासाठी सतत माहिती पुरविणारे माध्यम असावे म्हणून कडेगाव, कोल्हापूर, पुणे येथील लिंगायत धर्मीय युवकांनी व अभ्यासकांनी मिळून ही वेबसाईट बनवली आहे.  लिंगायत धर्माचे तत्वज्ञान व त्यावर आधारित विविध विषयांचे सखोल विश्लेषण हा प्रमुख उद्देश असला तरी ही वेबसाईट सर्वांगीण असेल जेणेकरून सर्व जागतिक माहितीचे पृथकरण करून जास्तीजास्त उपयुक्त माहिती व ज्ञान लिंगायत युवकांसाठी उपलब्ध करेल असे संपादकीय विभागातर्फे सांगण्यात आले आहे.या वेबसाईट तर्फे सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लिंगायत धर्मीय तज्ञांची सूची बनवण्याचे काम सुरु असून अश्या व्यक्तींनी आपली माहिती editor@lingayatyuva.com या इमेलवर पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर, लिंगायत युवा ही वेबसाईट लिंगायत धर्मीय लेखक तसेच अभ्यासक, उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी, महिला यांचेकडून नुतनिकृत वेबसाईट साठी इंग्लिश आणि मराठी मधून लेख मागवत आहे. प्रसिद्धीसाठी पाठवण्यात येणारे साहित्य editor@lingayatyuva.com या पत्त्यावर इमेल करण्यात यावे असे आवाहन वेबसाईट तर्फे करण्यात आले आहे.


 

लिंगायत धर्मीय युवकांसाठी वेबसाईट सुरु

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नगरपरिषदेचा नागरीकांच्या मागण्यांना सक्रीय प्रतिसाद

पलूस (सदानंद माळी) : आज पलुस नगरपरिषदेने प्रभाग क्रमांक तीन मधील नागरीकांच्या मागणीची दखल घेवुन प्रभाग व परिसरामध्ये पाहणी केली

Close