नगरपरिषदेचा नागरीकांच्या मागण्यांना सक्रीय प्रतिसाद0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस (सदानंद माळी) : आज पलुस नगरपरिषदेने प्रभाग क्रमांक तीन मधील नागरीकांच्या मागणीची दखल घेवुन प्रभाग व परिसरामध्ये पाहणी केली व पुढील नियोजन केले.

यामध्ये उत्तरेकडुन दक्षिणेकडे वाहणार्‍या ओढ्याची पाहणी करून त्यामधील अतीक्रमण काढणेबाबत, तसेच ओढा पुर्ववत करून स्वच्छ करणेबाबत दोन्ही बाजुच्या शेतकरी व प्लाॅटधारकांना घेवून चर्चा करून मार्ग काढला असुन, त्याचबरोबर ओढ्याच्या संलग्न पलुस- कराड रोड ते पलुस-रामानंदनगर रोड ला जोडणारा बायपासचे नियोजन केले आहे.

विद्यानगर, समर्थ काॅलनीसह, ओढ्याच्या पश्चिम भागातील सर्व भागातून येणारे पावसाचे पाणी,गटारे या ओढयास मिळतात.  सदरचा ओढा हा नैसर्गिक वाहत्या पाण्याचा प्रवाह आहे. महसूल विभागात ओढा नोंद असूनही काही लोकांनी या ओढ्यात अतिक्रमण केले आहे. पानगवत,कचरा,गाळ,साचल्याने व अतीक्रमणामुळे पाणी पुढे जात नव्हते. आत्तापर्यत या विषयाकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु, पलुस नगरपरिषदेने नागरीकांच्या मागणीची दखल घेतली. भविष्यात या भागात गटारे तुंबण्याची शक्यता आहे व शेजारील सर्व अपार्टमेंट मधील तळघरात पाणी साचून पलुसकरांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे याचा विचार करून ओढा पुर्ववत करणेसाठीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. नियोजीत संलग्न बायपासची निर्मिती झाल्यास पलुस शहराच्या विकासात भर पडणार आहे, याचे नियोजनही आज झाले असून लवकरच काम सुरू होत आहे.

यावेळी नगराध्यक्ष राजाराम सदामते, उपनगराध्यक्ष विक्रम (आप्पा) पाटील, पक्षप्रतोद सुहास पुदाले, पलुस तालुका युवक काॅग्रेसचे अध्यक्ष गिरीश (काका) गोदिंल, प्रतापतात्या गोदिंल, अॅड.के.डी. कांबळे, प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक नितीन (दादा) जाधव, प्रकाश (आप्पा)पाटील, नगरसेवक संदीप सिसाळ, गणपतशेठ पुदाले, सोमनाथ होमकर,अजीत बर्गे, युवक कार्यकर्ते पै. सुरज पाटील, विशाल पाटील, मुकुंद भोरे, स्वप्नील पाटील,अनिल देशमुख, बाळकृष्ण जाधव, प्रशांत येसुगडे, तसेच नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारीवर्ग, संबंधित शेतकरी, प्लाॅटधारक व नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

पलूस नगरपरिषदेच्या त्वरीत प्रतिसादामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

( नागरीक पत्रकार शरद पाटील यांनी दिलेल्या माहितीवर आधारीत वार्ता)

छाया सौजन्य : तरुण भारत


नगरपरिषदेचा नागरीकांच्या मागण्यांना सक्रीय प्रतिसाद

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नाईकबाची पालखी कडेगावमध्ये भक्तिपूर्ण उत्साहात साजरी

कडेगाव (सागर वायदंडे): आज कडेगाव येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठेनगरमध्ये गुलाल, ढोल, ताशा, झांजपथकाच्या वाद्यात नाईकबाची पालखी निघाली. "नाईकबाच्या नावानं चांगभलं"

Close