स्मिता (दिदी) आर आर पाटील: मातीचा वारसा आणि व्हिजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

तासगाव (सदानंद माळी) : अगदी तरुण वयात, शैक्षणिक आयुष्य सुरु असतानाच,  ग्रामीण तरुणी व महिलांचे नेतृत्व करायची जबाबदारी अंगावर घेतलेल्या ज्येष्ठ नेते कै. आर. आर. (आबा) पाटील यांच्या कन्या मा. स्मिता पाटील उर्फ दिदी यांचा आज वाढदिवस.

कायद्याचे शिक्षण पूर्ण करून एमबीए करत असतानाच राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होण्याची जबाबदारी अंगावर पडली आणि मागे वळून पाहता स्मितादिदी यांनी ती तितक्याच सक्षमपणे निभावली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांचा विश्वास सार्थ ठरवला असे स्पष्ट दिसत आहे.

आर आर आबांसारखे मातीच्या मूल्यांशी इमान राखणारे वडील आणि त्यांच्या विधायक राजकारणाचा वारसा घेऊन राजकीय पटलावर आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या स्मिता यांनी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताना ग्रामीण स्त्रिया व तरुणींना त्यांच्या हक्क व अधिकारांची जाणीव करून देणे व जागृती करणे असा वडिलांच्या राजकीय परंपरेला साजेशा व्हिजन जाहीर केला आणि त्यापद्धतीने काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला आहे. प्रत्येक विधायक काम हे राजकीय लाभापोटी नव्हे तर सामाजिक विकासाची नाळ सिद्ध करण्यासाठी करावे लागते याचा वस्तूपाठ त्यांनी राजकारणी मंडळी आणि मिडीयाला अगदी तरुण वायात घालून दिला आहे. अर्थात, व्हिजन ची कमतरता असणाऱ्या, आणि सोशल मिडिया आणि फ्लेक्स लावणे म्हणजे युवा नेते होणे असा भ्रम असणाऱ्या युवानेते मंडळी आणि त्यांचे सोशल मिडिया कार्यकर्ते या लोकांना हे समजणे थोडे अवघड आहे.

आबांचे राजकीय आणि वकिली कौशल्य अंगी बाणवलेल्या स्मिता यांनी आपल्या पदाची कालानुरूप जबाबदारी ओळखत महिलांची सुरक्षा हा मुद्दा घेऊन वेगवेगळ्या कायदेशीर व्यवस्था सुचवल्या आणि त्यासाठी सरकारने जबाबदार भूमिका घ्यावी अशी ठाम भूमिका घेतली.  पुरुषसत्ताक आणि त्यातून शहरी मध्यमवर्गीय मतदारांना केंद्रीभूत ठेवून सुरु असलेल्या सध्याच्या राजकारणात स्मिता यांनी विशिष्ट पद्धतीने मिडिया आणि राजकारणी यांना खरा महाराष्ट्र हा ग्रामीण ढंगाचा आणि ग्रामीण अंगाचा असल्याचे दाखवून देत ग्रामीण स्त्रियांची सुरक्षा आणि तक्रार दाखल करून घेण्यास लागणारा विलंब यावर सरकारवर टीका केली. गल्लीतून बुलेट फिरवणारे हजारो युवानेते तयार होत आहेत आणि त्यातील खुप सारे नेते फक्त फ्लेक्सवादी आहेत, अश्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये स्मिता यांच्यासारखे अभ्यासू व सुशिक्षित महिला नेतृत्व महाराष्ट्रात सक्रीय राजकारणात येणे हे कौतुकास्पद आणि सर्वसामान्य महाराष्ट्रीय जनतेसाठी अभिमानास्पद आहे.

तरुण महिला नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिर होणे हे जितके आव्हानात्मक आहे तितकेच सुशिक्षित आणि विधायक राजकारणाचा वारसा पुढे घेऊन जाणेही नवनवीन संकटे तयार करणारे आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि नीती समजून येणार नाही इतक्या वेगात बदलत आहे आणि नवनवीन आव्हाने तयार करत आहे. यावेळी स्मिता यांना टिकवून ठेवेल आणि वाढवेल  ती आर आर आबांनी मुंबईलाच नव्हे तर देशाला दाखवून दिलेली अट्टल मातीची अस्सल उर्जा. फार कमी व्यक्तीमत्वांना असं राजकीय पाठबळ, वारसा, आणि ज्ञानाची परंपरा लाभते. स्मिता याबाबतीत नशीबवान आहेत आणि कायद्याचा अभ्यास असल्याने कोणत्याही अडचणीवर त्या मात करण्यास सक्षम आहेत यात शंका नाही.

आबांच्या क्रांतिकारी योजना – ग्रामस्वच्छता अभियान किंवा तंटामुक्ती- यावर पुरेसे संशोधन होऊन ते सर्व सामाजिक विज्ञान व कायद्याच्या कोर्सेस मध्ये समाविष्ट करणे तसेच लोकसेवक तयार करणाऱ्या सर्व संस्थांमध्ये या योजनांचा आणि त्यातल्या सुधारणावादी तत्वांचा वापर केला जाणे आवश्यक आहे. आर आर आबांनी सिद्ध केलेले स्वच्छतेच्या संदर्भातील क्रांतिकारी मॉडेलकडे अक्षम्य दुर्लक्ष करून सध्याचे स्वच्छता धोरण परकीय ज्ञान व मॉडेल्सचा वापर करत आहे. स्मिता यांनी यासंदर्भात अभ्यास गटाची स्थापना करून आबांच्या ज्ञानाचा अथांग वारसा पुढे नेणे आवश्यक आहे, किंबहुना, धोरणात्मक नियोजनाचे एक मोठे ज्ञाननिर्मिती व प्रशिक्षण केंद्र आबांच्या जन्मभूमीत उभारणे ही स्मिता यांनी दिलेली समर्पक श्रद्धांजली आणि सामाजिक योगदान असेल.

विधायक राजकारण करणाऱ्या किंवा तशी क्षमता असणाऱ्यांना राजकारणात फक्त मुल्यांची नव्हे तर अट्टल राजकारणाची सुद्धा लढाई करावी लागते हा आजवरचा इतिहास आहे. स्मिता यांनी शेतीच्या समस्या, ग्रामीण विकासाच्या समस्या, महिलांच्या विकासाच्या व सुरक्षेच्या समस्या यावर सक्षमपणे आवाज उठवला आहे. प्रत्यके राजकीय कामाचे यश हे निवडणुकीमधील यशावर अवलंबून नसते आणि स्मिता यांचे नेतृत्व सध्या दूरगामी परिणाम करणाऱ्या विधायक राजकारणाची पायाभरणी करत आहे. सांगली जिल्हा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचे नाक समजले जाते. अश्या क्रांतिकारी भूमीत विकासाच्या राजकारणाचे धडे घेणारे आणि आर आर आबांचा वारसा पुढे नेणारे महिला नेतृत्व वाढत आहे ही जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारी घटना आहे.

वडिलांचा वारसा पुढे नेणे आणि त्याचबरोबर स्वतःचा वेगळा ठसा राजकीय पटलावर उमटवणे असे दुहेरी आव्हान स्मिता यांच्यासमोर दिसत आहे. मातीच्या मूल्यांशी इमान राखणाऱ्या आणि खोलवर मुळे धरून असलेला वारसा घेऊन काम करणाऱ्या स्मिता निश्चितच विधायक राजकारणाची परंपरा पुनर्स्थापित करतील आणि महाराष्ट्रातील महिलांना पुरुषसत्ताक राजकारणाचे बळी ठरू देणार नाहीत अशी फक्त आशा नव्हे तर विश्वास आहे असेच सुष्पष्ट भूमिका घेणारे त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व आहे.

कडेगाव-पलूस लाइव न्यूज तर्फे स्मिता आर आर पाटील, प्रदेशाध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!


15 thoughts on “स्मिता (दिदी) आर आर पाटील: मातीचा वारसा आणि व्हिजन

Comments are closed.

स्मिता (दिदी) आर आर पाटील: मातीचा वारसा आणि व्हिजन

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
15
Read previous post:
पलूस मध्ये ओढा स्वच्छता व रस्ता कामाचा शुभारंभ

पलूस (सदानंद माळी): आज पलुस नगरपरिषदेने प्रभाग क्रमांक तीन मधील नियोजीत ओढा स्वच्छता,व संलग्न रस्ता कामाचा शुभारंभ केला.  पलूस नगरपरिषदेचे

Close