डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या प्रकृतीत सुधारणा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कोल्हापूर (प्रतिनिधी): एम एन रॉय संस्थेचे संस्थापक आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहू कॉलेजचे प्राचार्य, थोर सामाजिक शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.  गेले आठ दिवसापासून सांगलीच्या भारती हॉस्पिटल मध्ये डॉ. कुंभार यांच्यावर उपचार सुरु आहेत. विश्रांती न घेता अहोरात्र काम, परिवर्तनवादी चळवळीच्या कामासाठी दौरे व धावपळ, आणि यातून वाढलेला मानिसक ताण यामुळे कुंभार सरांना काही दिवसापूर्वी अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

डॉ. राजेंद्र कुंभार हे भारतातील पुरोगामी चळवळ, शिक्षण अधिकार,  राजकीय-सामाजिक चळवळी,  रॉयवादी विचारसारणी आदी विषयावरचे जागतिक तज्ञ आहेत.  स्वस्त घर बांधणी तंत्रज्ञानाचे जनक समजले जाणारे डॉ. कुंभार अनेक शासकीय अभ्यासगट व समित्यामध्ये सतत काम करत असतात.

अनेक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ, संशोधक भेटीसाठी वेळ मागत असले तरी तब्बेतीवरील ताण लक्षात घेता वैद्यकीय तज्ञांनी आणख काही दिवस डॉ. कुंभार यांना बोलण्यापासून दूर ठेवले आहे.  तब्बेतीतील सुधारणा लक्षात घेता डॉ. कुंभार परत काही दिवसात काम व संशोधन सुरु करतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबीयांनी  व्यक्त केला.


डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या प्रकृतीत सुधारणा

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तडसर येथे ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न

तडसर (सदानंद माळी): शब्दरत्न  साहित्य सेवा प्रतिष्ठानच्यावतीने तडसर येथे पहिले ग्रामीण साहित्य  मराठी संमेलन काल संपन्न झाले.  जिल्हाधिकारी शेखर गायकवाड

Close