शेतकरी कर्जमाफी व जाधव यांची सुटका: ठोस कृतीची युवासेनेची मागणी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस (सदानंद माळी): त्वरित शेतकरी कर्जमाफी आणि कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानातून सुटका यासाठी सरकारने वेगात पाऊले उचलावीत यासाठी आज पलूस येथे तहसीलदारांना युवासेनेतर्फे लेखी निवेदन देण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष प्रशांत लेंगरे यांनी दिली.

कुलभूषण जाधव यांची अटक व हेरगिरीचे आरोप चुकीचे असून मोदी सरकारने यात लक्ष घालून महाराष्ट्राच्या सुपुत्राची सुटका होण्यासाठी ‘जशाश तसे’ उत्तर द्यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तालुका शिवसेनेद्वारा आज युवासेनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या एका गटासह पलूस तहसीलदारांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

पलूस तालुक्यातील लहरी हवामानाच्या परिणामामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून शेती तोट्यात असून त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याचबरोबर, पिक विम्याचे निकष पूर्णपणे चुकीचे असल्याने शेतकऱ्यास समाधानकारक भरपाई मिळत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून सेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मांडलेली शेतकऱ्यांची विनाअट कर्जमाफीची मागणी मान्य करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले आहे.  युवासेना पलूस यांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ मध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल आणि सरकारला कर्जमाफीसाठी भाग पाडण्यात येईल असे सांगण्यात आले.

या प्रसंगी युवासेना उपजिल्हाधिकारी सांगली प्रशांत लेंगरे, महादेव देसाई, राजाभाऊ माने, विजय आरबुने, महेंद्र पोतदार, जगदीश पवार, हरिष वडर, अभिजित गोपलकर, महेश शिंदे, आशितोष पाटील,  सुरज गावडे, अक्षय साळुंखे व सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद, मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व आश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

*विशेष उन्हाळी कार्यशाळा आयोजन सुरु आहे. आपल्या संस्थेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा अयोजोत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७. शालेय मुला-मुलीना सुट्टीनिम्मित फी मध्ये विशेष सवलत. 

 

शेतकरी कर्जमाफी व जाधव यांची सुटका: ठोस कृतीची युवासेनेची मागणी

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या प्रकृतीत सुधारणा

कोल्हापूर (प्रतिनिधी): एम एन रॉय संस्थेचे संस्थापक आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहू कॉलेजचे प्राचार्य, थोर सामाजिक शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या

Close