वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली भारत मुक्ती मोर्चातर्फे संयुक्त जयंती महोत्सव0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मिरज (प्रतिनिधी) : भारत मुक्ती मोर्चातर्फे रविवार १६ एप्रिल रोजी मिरजेच्या बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये ‘बहुजन प्रतिपालक छ. शिवराय ‘, महात्मा जोतीबा फुले, लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम मार्गदर्शन करतील.

या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून  प्रसिद्ध उद्योजक राजेश खाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून हातकनंगल्याचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर तसेच प्रसिद्ध अधिकारी अश्विनकुमार उके असतील.

या संयुक्त जयंती महोत्सवामध्ये अनेक अभ्यासक व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन होणार असून सध्या चर्चेत असलेल्या विविध मुद्द्यावर विचारमंथन  होणार आहे.

सर्व बुद्धीजीवी व बहुजन समाजातील लोकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


मुलांच्या अभ्यासविषयक समस्यांवर तज्ञ मार्गदर्शकांकडून सल्ला  सेल्फहूड (संपर्क: ९८१९१७९३७७), गरजूंना सवलतीच्या दरात सल्ला;

वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली भारत मुक्ती मोर्चातर्फे संयुक्त जयंती महोत्सव

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कडेगाव/पलूस (प्रतिनिधी): १२६ व्या डॉ. भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त आज कडेगाव व पलूस परिसरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध

Close